पहिल्या महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांच्या समक्ष भाजप नगरसेवकांचे घडले असे दर्शन

मुंबई :  मुंबई महापालिकेत मागील पाच वर्ष केवळ पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भूमिका बजावली. परंतु, आता भाजप शिवसेना महायुतीची सत्ता येवूनही भाजप नगरसेवकांच्या अंगात भिनलेला विरोधी पक्षाचा स्वभाव काही गेलेला नाही. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षात बसूनही भाजपच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षाप्रमाणे वर्तन करत आपण सत्तेत नाही तर विरोधी पक्षातच आहोत हे दाखवून दिले. विशेष म्हणजे भाजपचा काही नगरसेवकांनी चक्क महापौरांसमोरील वेलमध्ये जावून काँग्रेस आणि उबाठाच्या नगरसेवकांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला.


त्यामुळे नियमानुसार महापौरांच्या समोरील जागेत प्रवेश करण्याचा अधिकार कोणत्याही सदस्यांना नसतानाही सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक हे वेलमध्ये जावून पिठासीन अधिकारी आणि नवनिर्वाचित महापौरांच्यासमोरुन ये जा करत होते. याप्रकारे बेशिस्त वर्तन भाजपच्या नगरसेवकांकडून होत असताना प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व पाहत होते. त्यामुळे भाजपच्या या बेशिस्त नगरसेवकांना पक्ष काय शिस्त लावणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.


मुंबई महापालिका सभागृहामध्ये महापोर आणि उपमहापौरपदाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापौरांच्या भाषणा दरम्यान काँग्रेसच्या नगरसेवकांनी बसण्यास जागा नसल्यामुळे जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर घोषणाबाजी देतच त्यांनी सभागृहात महापौरांसमोरील वेलमध्ये धाव घेत तिथे उभे राहतच घोषणा देण्यास सुरुवात केली. याच वेळी भाजपच्या वांद्रे पश्चिम येथील नगरसेविकेने चक्क पिठासीन अधिकाऱ्यांच्या समोरील जागेत अर्थात वेलमध्ये चालत जात चक्क काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत समझोता करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या नगरसेवकांची समझूत काढताना, त्या भाजपच्या नगरसेवकांना 'तुम्ही शांत बसा मी सर्व बघते’,असे सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. पण हे करताना त्या महापौरांसमोरील प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या वेलमधून वावरत आहोत, याचा त्यांना विसर पडला होता. तसेच गल्लीतील भांडण सोडवावे, त्याप्रकारे त्या प्रयत्न करताना दिसत होत्या. त्यामुळे भाजप नगरसेविकेचे हे वर्तन सभागृहाच्या कार्यपध्दती शिस्त मोडणारे होते. परंतु त्यांना बाजुला करावे किंवा समज द्यावी अशाप्रकारे कोणत्याही सूचना पिठासीन अधिकारी यांनी त्यांना दिली नाही.


एकाबाजुला दुसऱ्यांदा निवडून आलेल्या नगरसेवकाकडून अशाप्रकारचे बेशिस्तीचे वर्तन होत असतानाच दुसरीकडे मालाड भागातील एका प्रथमच निवडून आलेला नगरसेवकही भाजपच्या गटनेत्यांच्या समोरुन वेलमध्ये जावून उबाठाच्या आणि काँग्रेसच्या नगरसेवकांविरोधात घोषणा देत होते. महापौर तथा पिठासीन अधिकाऱ्यांच्या समोरील जागेत जाण्यास कोणत्याही महापालिका सदस्याला अधिकार नसतानाही अशाप्रकारचे बेशिस्तीचे वर्तन खुद्द सत्ताधारी पक्षाच्या भाजपच्या नगरसेवकांकडून झाले होते. महापालिका सभागृहात त्याच वेळी प्रेक्षागॅलरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विराजमान होत सभागृहाचे कामकाज न्याहाळत होते. त्यामुळे महापौर तथा पिठासीन अधिकाऱ्यांच्या समोरील जागेत प्रवेश करत अशाप्रकारे आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांकडून झालेले बेशिस्त वर्तन त्यांना पटले असेल का असा प्रश्न निर्माण होत आहे. एवढेच नाहीतर उबाठा आणि काँग्रेसकडून होणाऱ्या विरोधातील घोषणाबाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी खुद्द भाजपचे गटनेते गणेश खणकर हे प्रोत्साहित करत होते. महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडणे हे सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्याची जबाबदारी असताना त्यांनी आपल्या सदस्यांना शांत राहायला सांगून महापौर आणि उपमहापौर यांना आपली भाषणे करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक होते. पण भाजपच्या गटनेत्याला आपल्याच नगरसेवकांवर लगाम घालता येत नव्हता,असे दिसून आले.



पहिल्याच सभेत भाजप, उबाठाचे गटनेते ठरले फेल


महापालिकेच्या पहिल्या सभेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची आसन व्यवस्था ही गटनेत्यांनी ठरवून त्यांना तिथे बसवणे ही त्यांची जबाबदारी असते. परंतु पहिल्याच सभेत भाजपचे गटनेते गणेश खणकर आणि उबाठाच गटनेत्या किशोरी पेडणेकर हे अपयशी ठरले. खणकर यांनी आपल्या नगरसेवकांना ज्येष्ठतेप्रमाणे प्रत्येकाची आसन व्यवस्था केली नाही, तसेच सभागृह सुरळीत चालवून घेण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या आसनाची व्यवस्था करून देण्याची सूचना पिठासीन अधिकाऱ्यांकडे न केल्यामुळे सभागृहात विरोधी पक्षाच्या गोंधळ वाढला गेला.तसेच उबाठाच्या नगरसेवकांनाही किशोरी पेडणेकर यांना गटनेत्या म्हणून आसनाच्या व्यवस्थेप्रमाणे कुठे कुणी बसावे याची व्यवस्था करता आलेली नाही. तसेच हरकतीचा मुद्दाही त्यांना प्रखरपणे मांडता न आल्यामुळे सभागृहातील भावी विरोधी पक्षनेता आणि भावी सभागृहनेत्यांची पुढील वाटचाल कशी असेल याची खात्री पटली आहे.

Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार