महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या टाऊन हॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला.. मागील स्थायी समितीच्या सभेत हा प्रस्ताव राखून ठेवताना जिमखान्याच्या जागेवर नवीन महापालिका सभागृह बनवण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यामुळे टाऊन हॉल बनवतानाच नगरसेवकांची संख्या वाढत असल्याने विद्यमान सभागृहाची जागा अपुरी पडत असल्यामुळे नविन सभागृह बांधण्याची मागणी करूनही त्यावर तीन सभांमध्ये कोणतेही ठोस सकारात्मक उत्तर न आल्यामुळे हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवून देण्यात आला.


मुंबई महापालिकेच्यावतीने मुख्यालयातसमोरील महापालिका क्रिडा भवनाच्या जागेवर टाऊन हॉल बांधण्याचा प्रस्ताव ६ मार्च २०२६ रोजी स्थायी समितीच्या सभेत पटलावर ठेवण्यात आला होता. या टाऊन हॉल जिमखान्याच्या बांधकामासाठी तब्बल ३६ कोटी रुपये खर्च केले जाणार होते. तर या कामासाठी डि ठक्कर कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव आला असता पहिल्या सभेत नगरसेवकांच्या वाहनांसाठी जागा नसल्यामुळे तिथे वाहनतळ बनवण्यात यावे, तर सभागृहनेते गणेश खणकर यांनी सध्याचे महापालिका सभागृह अपुरा पडत असल्यामुळे आणि भविष्यात नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे या जिमखान्याच्या जागेवर नवीन सभागृह बांधले जावे तसेच महापालिका कर्मचाऱ्यांच्या जिमखान्याचीही तिथे व्यवस्था करण्यात यावी,अशी मागणी केली होती.


याबाबत मागील तीन बैठकांमध्ये कोणतेही उत्तर न मिळाल्याने हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता. परंतु पुन्हा हा प्रस्ताव पटलावर आला असता सभागृहनेते गणेश खणकर यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला. महापालिका सभागृहाची जागा कमी पडते आणि भविष्यात ती आणखी पडणार या एकाच कारणासाठी नवीन सभागृह या जिमखान्याच्या जागेवर बांधण्याची मागणी केली आहे. पण प्रशासन त्यावर कोणतेही उत्तर देत नसेल तर हे योग्य नाही. त्यामुळे हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी केली. तर उबाठाचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी हा प्रस्ताव कायमस्वरुपी परत पाठवण्याची सूचना करत दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. याला फणसे यांनी पाठिंबा देत एकाच शहरात एकच टाऊन हॉल असतो असे सांगत ही जागा क्रीडा भवनाची असून ती महापालिका कर्मचाऱ्यांच्या जिमखान्याचीच राहायला हवी अशी मागणी केली. याला उबाठाच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. तर शिवसेनेचे अमेय घोले यांनी खणकर यांच्या फेरविचासाठी पाठवण्याच्या सूचनेला पाठिंबा देत सभागृह बनवणे हे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे अखेर अध्यक्षांनी विरोधी पक्षांनी केलेली दप्तरी दाखल करण्याची सूचना बहुमताच्या आधारे फेटाळून सत्ताधारी पक्षाची फेरविचारासाठी प्रस्ताव पाठवण्याची सूचना बहुमताच्या आधारे मंजूर करत हा प्रस्ताव परत फेरविचारासाठी पाठवून दिला.

Comments
Add Comment

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे