मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच पुढे येत नसल्यामुळे मिठीची सफाईच्या कामापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आजवर केलेल्या निविदा प्रक्रियेत एकही कंपनी पुढे येत नसल्याने हे पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत याचे काम करायचे का या विचारात असतानाच यासाठी अखेर महापालिकेला कंत्राटदार पावले. मिठी नदीच्या तीन भागातील कामांसाठी मागवलेल्या गाळ काढण्याच्या निविदेसाठी प्रत्येकी दोन कंपन्यांनी सहभाग नोंदवला असून ही निविदा तातडीने अंतिम करून शुक्रवार ते शनिवारपर्यंत कंत्राटदाराची निवड केली जाणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पूर्ण क्षमतेने मिठीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची ग्वाही अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्थायी समितीत दिली.


मिठी नदीच्या कामासाठी यापूर्वी नेमलेल्या तीन पैकी दोन कंपन्यांवर गुन्हा दाखल असून एका कंपनीला कळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे मिठी नदीसह एस विभाग आणि एम पश्चिम विभागातील मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या वतीने जुन्या निवायदा अटी वगळून सुधारित अटीनुसार निविदा मागवण्यात आल्या होत्या.आजवर यासाठी मुदतवाढ देऊनही याला कोणत्याही कंपनीच्या वतीने प्रतिसाद दिला जात नव्हता.त्यामुळे अखेर पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या वतीने यांत्रिक सेवा भाडेतत्वावर तसेच रोजगार संस्थांकडून मनुष्यबळाची सेवा पुरवून ही सफाई पूर्ण करण्याचा विचार केला होता.


मुंबईतील या नालेसफाई तसेच मिठी नदीच्या गाळाची सफाई कामांसंदर्भात पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत स्थायी समितीच्या सभेत सादरीकरण करण्यात आले. या सभेमध्ये मिठी नदीच्या कामासाठी मागवलेल्या निविदेसाठी मंगळवारी शेवटची तारीख होती. त्यामुळे सायंकाळी पर्यंत मिठी नदीच्या तीन भागातील कामांसाठी प्रत्येकी दोन कंपन्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. त्यामुळे लवकरच या निविदा खुल्या करून अत्यंत तातडीने याची पुढील प्रक्रिया करून पात्र कंत्राटदारांची निवड केली जाईल. त्यामुळे शनिवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि प्रत्यक्षात १ एप्रिलपासून कामाला सुरुवात करून प्रत्यक्षात ४ ते ५ तारखेपासून पूर्ण क्षमतेने सफाईच्या कामाला सुरुवात होईल असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला.


मिठी नदीसोबत मोठ्या नाल्याच्या कामांसाठी परिमंडळ ५ निविदा मागवण्यात आली आहे. परंतु याला प्रतिसाद न लाभल्याने येत्या २७ मार्च पर्यंत निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. तर परिमंडळ ३ आणि परिमंडळ ७मधील निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून शुक्रवारपर्यंत कंत्राट मंजुरीचा प्रस्ताव सादर केला जाईल,असेही त्यांनी सांगितले



छोट्या नाल्यांची सफाई एनजीओ कामगारांमार्फत


 

महापालिकेच्या एस विभाग आणि एम पश्चिम विभागासाठी निविदेत कोणीही भाग न घेतल्यामुळे त्याठिकाणी खासगी स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांची मदत घेवून तेथील गाळ काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल,असे त्यांनी सांगितले.



मुंबईतील नालेसफाईचे काम २ टक्के


 

मुंबईतील छोट्या,मोठ्या नाल्यांसाठी दोन वर्षांसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आल्याने यावर्षी १ मार्चपासून कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत यासर्व नाल्यांमधील गाळाची सफाई ही केवळ २ टक्केच झाल्याची माहिती खुद्द अभिजित बांगर यांनी दिली. शहर भागात २.७४ टक्के, पूर्व उपनगरातील ४ टक्के आणि पश्चिम उपनगरातील ०.६३ टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याची आकडेवारी बांगर यांनी यावेळी झालेल्या सादरीकरणादरम्यान दिली.



सफाई झाली तरी वजन काट्यावरील मोजमापामुळे...


 

मुंबईतील छोट्या,मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याची टक्केवारी सरासरी दोन टक्के दिसत असले तरी ही आकडेवारी प्रत्यक्ष वजन काट्यावर मोजमाप झालेल्या गाळाची आहे. प्रत्यक्षात नाल्यातील गाळ काढल्यानंतर पुढील ४८ दिवसांमध्ये सुकवण्यासाठी ठेवला जातो आणि डंपरमधून वजन काट्यावर वजन करून नियोजित डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. त्यामुळे गाळ भरण्यापासून ते वजन करणे आणि पुढे डम्पिंग ग्राऊंडवर टाकेपर्यंत व्हिडीओ शुटींग करून जिओ टॅगिंग तसेच एआयच्या माध्यमातून यावर लक्ष ठेवले जाते. त्यामुळे प्रत्यक्षात नाल्यातून बराच गाळ काढलाल गेला असला तरी वजन काट्यावरील मोजमापानुसार सध्या सरासरी २ टक्के सफाई झाल्याचे दिसून येत आहे.




मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी किती निविदा प्राप्त झाल्या


 

फिल्टरपाडा, पवई ते टीचर्स कॉलनी आउटफॉल, कुर्ला


निविदा प्राप्त: ०२



टीचर्स कॉलनी, कुर्ला ते न्यू बीकेसी कनेक्टर ब्रिज


निविदा प्राप्त: ०२



न्यू बीकेसी कनेक्टर ब्रिज ते माहिम कॉजवे आणि त्याचे उपनाले


निविदा प्राप्त: ०२

Comments
Add Comment

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा