मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका मालमत्ता कर जमा झाला असून मालमत्ताधारकांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत करभरणा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे, थकबाकी असलेल्या सर्व मालमत्ताधारकांनी तसेच चालू आर्थिक वर्षाचा करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी करभरणा करून दंडात्मक कारवाई टाळावी असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी केले आहे. दरम्यान, मालमत्ताधारकांना विहित वेळेत मालमत्ता करभरणा करता यावा, यासाठी सार्वजनिक सुटी व साप्ताहिक सुटीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्र सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.


मालमत्ता करासंदर्भात महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी आढावा बैठक पार पडली. त्यावेळी डॉ. जोशी बोलत होत्या. सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्यासह परिमंडळीय उपकरनिर्धारक व संकलक तसेच सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक करनिर्धारक व संकलक यावेळी उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) अंतर्गत आतापर्यंत संकलित झालेला मालमत्ता कर आणि थकबाकीचा बैठकीत आढावा घेण्यात आला.


सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा तसेच थकीत मालमत्ता कर दिनांक ३१ मार्च २०२६ पूर्वी न जमा केल्यास संबंधित मालमत्ताधारकांविरोधात महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. निश्चित केलेल्या ध्येयानुसार कर संकलन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तसेच, थकीत करभरणा न करणाऱ्या मालमत्तांवर तत्काळ अटकावणी आणि जप्तीची कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.


मालमत्ताधारकांनी दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत करभरणा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे, थकबाकी असलेल्या सर्व मालमत्ताधारकांनी तसेच चालू आर्थिक वर्षाचा करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी दिनांक ३१ मार्च २०२६ पूर्वी करभरणा करून दंडात्मक कारवाई टाळावी. तथापि, मालमत्ताधारकांना विहित वेळेत मालमत्ता करभरणा करता यावा, यासाठी सार्वजनिक सुटी व साप्ताहिक सुटीच्या दिवशी म्हणजे दिनांक २६, २८ व २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत तसेच दिनांक ३० आणि ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र (सीएफसी) सुरू राहतील, असेही डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या

Maharashtra FDA : FDAची मोठी कारवाई! मुंबईतील 7 ठिकाणांचे परवाने निलंबित; गुटखा प्रकरणात 6 जणांना अटक

मुंबई : महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राबवण्यात