बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान ?

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. हिंसक आंदोलन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला. सध्या त्या भारतात सुरक्षित ठिकाणी वास्तव्यास आहेत. शेख हसीनांनी देश सोडल्यानंतर अमेरिकेच्या पाठिंब्याच्या जोरावर एक हंगामी व्यवस्था निर्माण करण्यात आली. नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस या व्यवस्थेचे प्रमुख झाले. पण जनतेचा दबाव वाढू लागल्यामुळे निवडणुकीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार बांगलादेशमध्ये आज म्हणजेच गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी मतदान सुरू आहे.


आतापर्यंत ठिकठिकाणी हिंसेच्या घटना घडल्या आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि इस्लामी जमात-ए-इस्लामी या माजी मित्रपक्षांच्या नेतृत्वाखालील दोन आघाडी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. बांगलादेशच्या राजकारणाचे अभ्यासक यंदाच्या निवडणुकीत बीएनपीला फायदा होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. निवडणुकीचा निकाल शुक्रवार १३ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर होणार आहे.


बांगलादेशमध्ये १२ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त पात्र मतदार आहेत. पण मतदानाचा आतापर्यंतचा उत्साह बघता सार्वत्रिक निवडणुकीतले एकूण मतदान हे ५० टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेचार या वेळेत मतदान होणार आहे. भारतीय वेळेनुसार बांगलादेशमध्ये संध्याकाळी पाच वाजता मतदानाची मुदत संपणार आहे.


यंदा सहा लाख ४८ हजार जणांनी बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी टपालाद्वारे मतदान केले आहे. बांगलादेशमध्ये १३ व्या राष्ट्रीय संसदीय निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

US Military Casualties : इराणविरुद्धच्या युद्धात १८ सैनिकांचा मृत्यू आणि ७५६ जवान जखमी, अमेरिकेने दिली माहिती

वॉशिंग्टन डीसी : इराण विरुद्धच्या युद्धात सहा महिन्यांत १८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या युद्धात ७५६ जवान

Earthquake in Japan : जपानमध्ये ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप, अनेक जखमी

टोकियो : जपानमध्ये रविवारी मध्यरात्री दोन वाजता कांटो प्रदेशात ५.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

USA : अमेरिकेतून ५,२०० भारतीय हद्दपार

वॉशिग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांविरोधातील कारवाई

US vs Canada Trade War Update : कॅनडाचा थेट ट्रम्प यांना इशारा! अमेरिकेला 'जशास तसे' उत्तर; व्यापार चर्चा ठरली निष्फळ!

वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि कॅनडा (Canada) यांच्यातील तीन दिवसांपासून सुरू असलेली महत्त्वाची व्यापार चर्चा अखेर

California Assembly : कॅलिफोर्निया असेंब्लीचा ऐतिहासिक निर्णय; ८ नोव्हेंबरला ‘दिवाळी डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने गुरुवारी एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करत यंदा रविवार, ८