भारताने ओलांडला २०० चा टप्पा, नामिबियाला दिले मोठे आव्हान

नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारताने २० षटकांत नऊ बाद २०९ धावा केल्या आणि नामिबियाला २० षटकांत २१० धावा करण्याचे आव्हान दिले.


आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील १८ व्या साखळी सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आले. अभिषेक शर्मा रुग्णालयात असल्यामुळे ईशान किशन आणि संजू सॅमसन ही जोडी सलामीला आली. संजू सॅमसनने वर्ल्डकपमध्ये दमदार पदार्पण केले. त्याने आठ चेंडूत तीन षटकार आणि एक चौकार मारत २७५ च्या स्ट्राईक रेटने २२ धावा केल्या. संजूचा हा झंझावत बेन शिकोंगोच्या चेंडूवर लॉरेन स्टीनकॅम्पने कॅच पकडल्यामुळे थांबला. ईशान किशनने २४ चेंडूत पाच षटकार आणि सहा चौकार मारत २५४.१७ च्या स्ट्राईक रेटने ६१ धावांची वेगवान खेळी केली. गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर बेन शिकोंगोने त्याचा कॅच पकडला. तिलक वर्मा २१ चेंडूत ३ चौकार मारत ११९.०५ च्या स्ट्राईक रेटने २५ धावा केल्यानंतर गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर स्मिट बोल्डकडे कॅच देऊन परतला. कर्णधार सूर्यकुमार यादव (९२.३१ स्ट्राईक रेट) १३ चेंडूत १२ धावा करून बर्नार्ड स्कोल्झच्या चेंडूवर झेन ग्रीनने यष्टीचीत केल्यामुळे परतला.


हार्दिक पंड्याने ४ षटकार आणि ४ चौकार मारत १८५.७१ च्या स्ट्राईक रेटने २८ चेंडूत ५२ धावा केल्या. गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर डायलन लीचरने त्याचा कॅच पकडला. शिव दुबे धावचीत झाला. त्याने १६ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार मारत २३ धावा केल्या. रिंकू सिंग अपयशी ठरला, तो ६ चेंडूत एक धाव करून स्मितच्या चेंडूवर गेरहार्ड इरास्मसकडे कॅच देून परतला. पाठोपाठ अक्षर पटेलही शून्य धावा करून गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. वरुण चक्रवर्ती एक धाव करून नाबाद राहिला तर अर्शदीप सिंग २ धावा करून धावचीत झाला.


टी ट्वेंटी विश्वचषकात अर्धशतक झळकवणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक झाला ईशान

टी ट्वेंटी विश्वचषकात अर्धशतक झळकवणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक होण्याचा मान ईशान किशनने पटकावला आहे. याआधी ही कामगिरी कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाला जमली नव्हती. अभिषेक शर्मा रुग्णालयात असल्यामुळे ईशान किशन आणि संजू सॅमसन ही जोडी सलामीला आली. यष्टीरक्षक ईशानने पाच षटकार आणि सहा चौकार मारत २५४.१७ च्या स्ट्राईक रेटने २४ चेंडूत ६१ धावा केल्या. तो टी ट्वेंटी विश्वचषकात अर्धशतक झळकवणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक झाला. गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर बेन शिकोंगोने कॅच घेतल्यामुळे त्याला परतावे लागले.



नामिबियाकडून गेरहार्ड इरास्मसने चार तर बर्नार्ड स्कोल्झ, जेजे स्मित आणि बेन शिकोंगोने प्रत्येकी एक विकेट घेतली.

गेरहार्ड इरास्मसने घेतल्या चार विकेट

नामिबियाचा कर्णधार असलेल्या गेरहार्ड इरास्मसने भारताच्या चार फलंदाजांना बाद केले. यामुळे भारताच्या झंझावाताचा वेग थोडा मंदावला. गेरहार्ड इरास्मसने २० धावा देत चार विकेट घेतल्या. कर्णधार म्हणून टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये चार विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानी आहे. या यादीत अफगाणिस्तानचा राशिद खान पहिल्या, न्यूझीलंडचा डॅनिअल व्हेटोरी दुसऱ्या आणि ओमानचा झीशान मकसूद तिसऱ्या स्थानी आहे. गेरहार्ड इरास्मसने ६१ धावा करणाऱ्या ईशान किशन, २५ धावा करणाऱ्या तिलक वर्मा, ५२ धावा करणाऱ्या हार्दिक पंड्या आणि शून्य धावा करणाऱ्या अक्षर पटेलला बाद केले.
Comments
Add Comment

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो