राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरले; माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा टोला

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईत केलेल्या उद्बोधनावर राज ठाकरे यांनी टीका केली. त्यानंतर भाजपसह संघ वर्तुळातून राज यांच्या विधानाचा कठोर शब्दांत समाचार घेतला जात आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील राज यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत, "सरसंघचालकांच्या उद्बोधनाला आलेले मान्यवर नव्हे, तर राज ठाकरेच नरेंद्र मोदींना जास्त घाबरत आहेत, " असा टोला लगावला.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाची भूमिका, कार्यपद्धती आणि समाजातील योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. त्यामुळे या कार्यक्रमाची देशभरात चर्चा झाली. या कार्यक्रमानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून टीका केली. कार्यक्रमाला आलेली मंडळी संघप्रेमापोटी नव्हती, तर सरकारच्या दबावामुळे किंवा भीतीमुळे आली होती, असा आरोप त्यांनी केला. यापूर्वी अशा कार्यक्रमांना कोणी का उपस्थित राहिले नव्हते, असा सवाल उपस्थित करत ही उपस्थिती संघासाठी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भीतीपोटी असल्याचे त्यांनी म्हटले.


राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर भगतसिंह कोश्यारी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. संघाच्या कार्यक्रमाला लोक मोदींना घाबरून आले नव्हते. उलट राज ठाकरेच नरेंद्र मोदींना जास्त घाबरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज ठाकरे यांनी मोदींना घाबरू नये, तर त्यांच्या जवळ जावे, असा सल्लाही त्यांनी दिला. मोदींसाठी सर्व जनता समान आहे, असे सांगताना कोश्यारी यांनी प्रभू राम आणि त्यांच्या प्रजेचा दाखला दिला. ज्या पद्धतीने रामाला सर्व प्रजा समान होती, त्याचप्रमाणे मोदींसाठीही सर्व नागरिक समान आहेत, असे ते म्हणाले. राज ठाकरे माझे ‘लहान भाऊ’ आहेत. ते वाणीने कडक असले तरी चांगले नेते असल्याचेही त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीत राहणाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत, चुकीचे काम करण्यास घाबरावे; मात्र व्यक्तींना घाबरू नये, असा सल्लाही भगतसिंह कोश्यारी यांनी दिला.

Comments
Add Comment

इराण युद्धाबाबत सकाळी ट्रम्प मोठी घोषणा करणार

वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प २ एप्रिलला सकाळी ६.३० वाजता ते देशाला संबोधित करणार आहेत. इराणसोबत

रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर

समृद्धी महामार्गावर आठ महिलांचा अपघाती मृत्यू

मुंबई : समृद्धी महामार्गावर जालना परिसरात भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ मजूर महिलांचा

मुंबईतील १९८५ ते २०२५ पर्यंतच्या आरक्षित वास्तूंचा शोध घ्या, कागदपत्रे तपासा; महापौरांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तू,

अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी है तो सब मुनकीन है

लक्ष्यापेक्षा २७० कोटी रुपयांची मालमत्ता कराची अधिकची वसुली मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या

Mumbai : ना सोसाट्याचा वारा सुटला, ना पाऊस पडला पण झाडाची फांदी तुटून एकाचा मृत्यू झाला

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नागरिक असह्य उकाड्याने हैराण आहेत, त्याचवेळी राज्याच्या काही