अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी है तो सब मुनकीन है

लक्ष्यापेक्षा २७० कोटी रुपयांची मालमत्ता कराची अधिकची वसुली


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता कर संकलनाच्या बाबतीत यंदा विक्रमी कामगिरी केली आहे. मालमत्ता कर संकलनाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी निर्धारित करण्यात आलेल्या ७ हजार ३४१ कोटी रुपयांच्या सुधारित उद्दिष्टाच्या तुलनेत महानगरपालिकेने ७ हजार ६१० कोटी ९० लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलन केले आहे. त्यामुळे एकूण टार्गेटपेक्षा सुमारे २७० कोटी रुपयांचा जास्त महसूल जमा करतानाच ३१ मार्च २०२६ रोजीच्या या एकाच दिवशी ३९९ कोटी ७४ लाख रुपयांचा महसूल गोळा करून नवीन विक्रमही नोंदवला आहे. महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल करनिर्धारण व संकलन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.


मुंबईकर नागरिकांना मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध नागरी सेवा व सुविधा पुरविल्या जातात. मालमत्ता कर हा एक अत्यंत महत्त्वाचा, स्थिर आणि विश्वासार्ह महसुली स्रोत म्हणून विशेष अधोरेखित होतो.या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार आणि करनिर्धारक व संकलक गजानन बेल्लाळे यांच्या देखरेखीखाली, करनिर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता कर संकलनासाठी व्यापक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे व्यापक व जबाबदारीपूर्ण कामकाज यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरही, करनिर्धारण व संकलन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर संकलनासाठी उल्लेखनीय समर्पण, सातत्य आणि अपेक्षेपेक्षा अधिक परिश्रम घेतले; ही बाब निश्चितच विशेष उल्लेखनीय आणि अत्यंत कौतुकास्पद आहे.


मुंबई महानगरपालिकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ७ हजार ३४१ कोटी रुपये मालमत्ता कर संकलनाचे सुधारित उद्दिष्ट ठेवले होते. करनिर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे तसेच मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याने महानगरपालिकेने सन २०२५ -२६ या आर्थिक वर्षासाठी १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या निर्धारित कालावधीदरम्यान ७ हजार ६१० कोटी ९० लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलित करण्यात आले. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या १०३.६८ टक्के इतके आहे. सोबतच, अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात ३०१ कोटी १३ लाख रुपयेही संकलित करण्यात आले आहेत.


प्रशासकीय विभागनिहाय कामगिरीचा विचार करता, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षामध्ये के पूर्व (७१९ कोटी २३ लाख रुपये), जी दक्षिण (६७० कोटी ६४ लाख रुपये), के पश्चिम (६२२ कोटी १६ लाख रुपये), एच पूर्व (५७७ कोटी ७८ लाख रुपये) आणि एच पश्चिम (५३६ कोटी ५५ लाख रुपये) या विभागांनी सर्वाधिक मालमत्ता कर संकलन नोंदवले असल्याची माहिती करनिर्धारण व संकलन विभागाने दिली आहे.


विधी समिती अध्यक्षांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक : महसूल प्राप्तीसाठी उत्तम कामगिरी केल्याबद्दल विधी समिती अध्यक्षा दिक्षा हर्षद कारकर यांच्याकडून करनिर्धारण व संकलन, जल अभियंता, अनुज्ञापन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच, भविष्यातही अशीच कामगिरी करित राहावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.


आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये प्रशासकीय विभागनिहाय संकलित मालमत्ता कर -


शहर विभाग -




  1. ए विभाग – २७० कोटी ७ लाख रुपये

  2. बी विभाग – ४७ कोटी ३१ लाख रुपये

  3. सी विभाग – ९० कोटी १४ लाख रुपये

  4. डी विभाग – २९९ कोटी ५३ लाख रुपये

  5. ई विभाग – १५० कोटी ८ लाख रुपये

  6. एफ दक्षिण विभाग – १६५ कोटी ९० लाख रुपये

  7. एफ उत्तर विभाग – १५७ कोटी ७६ लाख रुपये

  8. जी दक्षिण विभाग – ६७० कोटी ६४ लाख रुपये

  9. जी उत्तर विभाग – २५१ कोटी १७ लाख रुपये

  10. एकूण संकलित कर रक्कम – २ हजार १०२ कोटी ६० लाख रुपये


पश्चिम उपनगरे-




  1. एच पूर्व विभाग – ५७२ कोटी ७८ लाख रुपये

  2. एच पश्चिम विभाग – ५३६ कोटी ५५ लाख रुपये

  3. के पूर्व विभाग – ७१९ कोटी २३ लाख रुपये

  4. के पश्चिम विभाग – ६२२ कोटी १६ लाख रुपये

  5. पी दक्षिण विभाग – ३७२ कोटी २३ लाख रुपये

  6. पी उत्तर विभाग – २७७ कोटी २२ लाख रुपये

  7. आर दक्षिण विभाग – २८८ कोटी ८१ लाख रुपये

  8. आर मध्य विभाग – २९४ कोटी ९४ लाख रुपये

  9. आर उत्तर विभाग - ९७ कोटी ४१ लाख रुपये

  10. एकूण संकलित कर रक्कम – ३ हजार ७२१ कोटी ३३ लाख रुपये


पूर्व उपनगरे-




  1. एल विभाग – ३०४ कोटी ५७ लाख रुपये

  2. एम पूर्व विभाग – ११३ कोटी ९३ लाख रुपये

  3. एम पश्चिम विभाग – १८४ कोटी ७० लाख रुपये

  4. एन विभाग – २४२ कोटी ३० लाख रुपये

  5. एस विभाग – ३९८ कोटी ४७ लाख रुपये

  6. टी विभाग – २१३ कोटी ४४ लाख रुपये

  7. एकूण संकलित कर रक्कम – १ हजार ४५७ कोटी ४१ लाख रुपये

Comments
Add Comment

Bandra News : वांद्रे परिसरातील जागेवरील कारवाईदरम्यान राडा; जमावाला रोखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील गरीबनगर भागात अवैध बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान सलग

Bandra News : वांद्रे स्टेशन परिसरात अतिक्रमण हटवणाऱ्यांवर दगडफेक, ६ पोलीस आणि ४ आंदोलक जखमी

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार