Mumbai : ना सोसाट्याचा वारा सुटला, ना पाऊस पडला पण झाडाची फांदी तुटून एकाचा मृत्यू झाला

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नागरिक असह्य उकाड्याने हैराण आहेत, त्याचवेळी राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असे वेगवेगळे वातावरण आहे. या वातावरणात मुंबईच्या कुलाबा भागात ना सोसाट्याचा वारा सुटला, ना पाऊस पडला पण झाडाची फांदी तुटून एकाचा मृत्यू झाला आणि काही जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मुंबईतील कुलाबा परिसरात पोलीस महासंचालक कार्यालयासमोर एका झाडाची फांदी तुटून एकाचा मृत्यू झाला आणि काही जण जखमी झाले. गुलमोहराच्या झाडाची मोठी फांदी अचानक तुटून पडली. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी त्या भागातून जात असलेल्या वाहनांवर फांदी पडली. एकूण चार वाहनं ही फांदीखाली सापडली. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले. जखमींना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अनिल भगोजी मोरे या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


झाडाची फांदी कोसळून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिशियनचा मृत्यू : मुंबईच्या कुलाबा भागात गुलमोहराच्या झाडाची मोठी फांदी अंगावर पडल्यामुळे अनिल भगोजी मोरे या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अनिल भगोजी मोरे हे सार्वजनिक बांधकाम विभागात इलेक्ट्रिशियन म्हणून कार्यरत होते. ते त्यांची कुलाबा येथील पोलीस मुख्यालय आणि जवळच्या आमदार निवासात ड्युटी होती. तिथल्याच एका कूलरचे काम करून परत असताना फांदी अंगावर पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.


मदतकार्य : झाडाची फांदी हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. यानंतर वाहतूक पूर्वत सुरू झाली आहे. मुंबई अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचारी यांनी पोलिसांच्या सहकार्याने तातडीने मदतकार्य केले. यामुळे लवकरच परिस्थिती नियंत्रणात आली आहे. सोसाट्याचा वारा आणि पाऊसही पडत नव्हता, अशावेळी अचानक फांदी तुटण्याचे कारण समजलेले नाही. नियमानुसार दुर्घटनेची चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या