मुंबईतील १९८५ ते २०२५ पर्यंतच्या आरक्षित वास्तूंचा शोध घ्या, कागदपत्रे तपासा; महापौरांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तू, मालमता, मिळकत यासंदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार पडली. यामध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने सन १९८५ ते २०१५ या कालावधीतील वास्तूंची माहिती संकलित करावी. सन २०१५ नंतरचे अभिलेखही तयार करावेत. ज्या प्रयोजनासाठी आरक्षण आहे. त्यासाठीच या वास्तू, भूखंड, मालमत्ता यांचा वापर झाला पाहिजे. तसेच, त्यातून महानगरपालिकेच्या महसुलात वाढ व्हायला हवी, या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश महापौरांनी दिले.


मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोबत महापौर दालनात बुधवारी पार पडलेल्या या सभेत माजी खासदार किरीट सोमय्या, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) सुनील राठोड, सहायक आयुक्त (मालमत्ता) पृथ्वीराज चव्हाण आणि इतर संबंधित अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.


महानगरपालिकेच्या विविध जागा, वास्तू, मालमत्ता या सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण अथवा इतर नागरी कारणांसाठी विकसित करताना काही प्रकरणांमध्ये विकासकांनी अशा वास्तू महानगरपालिकेस हस्तांतरित न करता, स्वतःच्या ताब्यात ठेवून त्याचा अयोग्य वापर आहे, असा मुद्दा सोमय्या यांनी मांडला. अशा जागा / वास्तू / मालमत्ता यांची यादी तयार करुन, महानगरपालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, या जागा / मालमत्ता पुन्हा ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

Comments
Add Comment

Mumbai Bomb Threat : मुंबईत खळबळ! महापौर कार्यालय, BMC मुख्यालय आणि मेट्रो स्थानकांना बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. मुंबई महापौर कार्यालय,

Mumbai Local Train : मुंबई लोकलमध्ये वडाळाजवळ पुरुषाकडून महिलेला बेदम मारहाण; बेल्ट काढून धमकी, सहप्रवाशी ठरले मूकदर्शक!

मुंबई : मुंबईकरांची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या 'लोकल ट्रेन' (Mumbai Local Train) मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा

Birthday Celebration Firing : 'बड्डे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा'; रस्त्यात सेलिब्रेशन अन् बेबी एअरगनमधून गोळीबार महागात पडली

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये बेबी एअरगनमधून गोळीबार;10 जणांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपी ताब्यात बोरिवली :

Publications Banned : अतिरेकी विचारांचे उदात्तीकरण करणाऱ्या ११४ प्रकाशनांवर बंदी

- राज्य सरकारचा निर्णय; 'काश्मीर किफाह – रेझिलियन्स अँड करेज', 'नवाई गझवा-ए-हिंद'चा समावेश मुंबई : हिंसक अतिरेकी

Mumbai News : गृहनिर्माण सोसायट्यांनी पदपथांवरील रॅम्प, अतिक्रमणे तातडीने हटवावेत; अन्यथा कठोर कारवाई

महापालिका आयुक्तांचे इशारावजा आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ हे नागरिकांना सुरक्षितपणे आणि

Mumbai Mandai News : मुंबईतील मंड्यांच्या पुनर्विकासासाठी धोरणात्मक घेणार निर्णय

स्थायी समितीच्यावतीने होणार विशेष बैठक मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक मंडईंचा पुनर्विकास रखडलेला असून