सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधी वाढवून मिळावा; मंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०२५-२६ साठी ९०० कोटी रुपयांची तरतूद होती. सन २०२६ - २७ साठी ही ६९१.९० कोटी रुपये मर्यादा शासनाने कळवली आहे. म्हणजे पुढील वर्षासाठी २०९ कोटी नियतव्यय कमी करण्यात येणार आहे. मात्र आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचा निधी कमी करू नये, शासकीय यंत्रणांकडून अधिक ६४२ कोटी इतकी वाढीव निधीची मागणी आहे. त्यानुसार ६९१.९० अधिक ६४२ अशी एकूण १३३३.९० कोटी इतकी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.


जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा मंत्री, वित्त व नियोजन, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान येथे नाशिक जिल्ह्याची ऑनलाइन पद्धतीने बैठक पार पडली. या बैठकीस मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ही उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी मागणी केली.


बैठकी दरम्यान मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, सन २०२५-२६ या वर्षासाठी नाशिक जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत ९०० कोटी इतकी तरतूद करण्यात आली होती. मात्र सन २०२६-२७ साठी प्रस्तावित तरतूद ६९१.९० कोटी इतकी मर्यादा कळवण्यात आली आहे.जिल्ह्याचा वेगाने होत असलेला विकास, नाशिक जिल्ह्यातून मिळणारा सर्वाधिक महसूल,वाढती लोकसंख्या आणि विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या वाढीव मागण्या लक्षात घेता निधी कमी करू नये असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.


नाशिक जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी नाशिक कलाग्राम आणि गंगापूर धरण येथील सी प्लेन बाबत लवकर कार्यवाही करण्याची त्यांनी मागणी केली. तसेच सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मंजूर निधीचा आढावा घेताना त्यांनी प्रशासनाला निधी खर्चाच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना दिल्या. सर्व योजनांच्या सर्व प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात याव्या तसेच मार्च अखेर पर्यंत १००टक्के निधी खर्च होईल याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.


नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, अशी अपेक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शाळा खोल्यांची दुरुस्ती आणि वर्गखोल्यांसाठी वाढीव निधीची मागणी केली.

Comments
Add Comment

PUC Certificate : सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! PUC साठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सविस्तर

मुंबई :  महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ

Breaking! अमरावतीच्या डफरिन रुग्णालयातील NICU विभागाला भीषण आग; 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला

Mazgaon Ganpati : मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीत अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणाव, पोलिसांकडून तपास सुरू, पहा Video

मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग