महाकृषि कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डेटा-आधारित परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाने महाकृषि कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ जाहीर केले आहे. हे धोरण कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये ‘एआय’चा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या धोरणांतर्गत महा एजीएक्स (महाराष्ट्र कृषी डेटा एक्सचेंज), एआय-सक्षम ट्रेसिबिलिटी प्रणाली, एआय आधारित भू-स्थानिक बुद्धिमत्ता इंजिन, शेतकरी-केंद्रित एआय सल्ला मंच-महाविस्तार या डिजिटल पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक केंद्र म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता व अॅग्रीटेक नाविन्यता केंद्र कार्यरत असून, शासनाने पहिल्या टप्प्यात रुपये 500 कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे.
एआय फॉर ॲग्री २०२६
एआय फॉर ॲग्री २०२६ कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित, समावेशक, हवामान-संवेदनशील आणि शेतकरी-केंद्रित कृषी परिवर्तनाला चालना देणारे हे एक प्रमुख जागतिक व्यासपीठ आहे. २२ व २३ फेब्रुवारी २०२६ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई येथे ‘एआय अॅग्री २०२६’ चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये धोरणकर्ते,आंतरराष्ट्रीय संस्था,शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, शेतकरी उत्पादक संस्था तसेच शेतकरी समुदायाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ही परिषद डेटा-आधारित आणि तंत्रज्ञान-सक्षम कृषी परिसंस्था निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे. संयुक्त राष्ट्राने २०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केले आहे त्यामुळे शेतीमध्ये महिला शेतकऱ्यांची भूमिका यामध्ये महत्वाची आहे त्यांच्यासाठीही या परिषदेमध्ये माहितीपूर्ण संवादसत्र आयोजित करण्यात येणार आहेत.
विविध चर्चासत्रांचे आयोजन
एआय फॉर ॲग्रीमध्ये दोन दिवस विविध चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये कृषी व अन्न प्रणाली परिवर्तनासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, महिला शेतकऱ्यांसाठी समावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता : सक्षमीकरण, समता आणि नेतृत्व, ॲग्री एआयसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा: डेटा, विश्वास, ट्रेसिबिलिटी आणि प्लॅटफॉर्म्स, ॲग्री एआय मधील गुंतवणूक : बाजारपेठा आणि विस्तारक्षम नवोन्मेष, जागतिक वैज्ञानिक सहकार्य आणि एआय फॉर ॲग्री संशोधन नेटवर्क, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर, धोरणात्मक मार्ग आणि जागतिक प्रशासन याविषयाचा समावेश %