10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी पासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. अशातच ठाणे वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून एक अनोखी शक्कल लढवली आहे.


परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना होणाऱ्या प्रवासाच्या अडचणी कमी करण्यासाठी, ठाणे वाहतूक पोलिसांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात मोटारसायकलवर ५४ वाहतूक हवालदार तैनात केले आहेत.


वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थी किंवा त्यांचे पालक वाहतूक नियंत्रण हेल्पलाइन, व्हॉट्सअॅप किंवा १८ ट्रॅफिक युनिटपैकी कोणत्याही एका युनिटद्वारे त्यांचे लाईव्ह लोकेशन शेअर करून मदत मागू शकतात. वाहतूक कोंडी किंवा वाहनांच्या बिघाडामुळे त्यांना उशीर होऊ नये म्हणून दुचाकीवरून एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्यांना परीक्षा केंद्रावर सोडेल.


गेल्या वर्षीही असाच एक उपक्रम ठाणे वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात आला होता. त्यावेळी ३२ पोलिसांनी दुचाकीवरून वाहतूक कोंडीत अडकलेल्या ३४ विद्यार्थ्यांची मदत केली होती.


सध्या सर्वत्र अनेक रस्त्यांची कामे, मेट्रो बांधकाम आणि महामार्ग प्रकल्प सुरू असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. अशातच परीक्षेच्या काळात सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत जड वाहनांना त्या मार्गांवरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जड वाहन चालकांनी याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.


ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २२३ आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १२६ परीक्षा केंद्रे आहेत.

Comments
Add Comment

नागपूरकरांवर पाणीसंकट; सलग २ दिवस या भागात राहणार पाणी पुरवठा बंद

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Baramati By Election : सुनेत्रा ताईंचा फोन आला अन्...बारामती पोटनिवडणुकीबाबत लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू

Akola Crime News : अकोल्यात ‘धुरंधर’ (Dhurandhar 2 ) स्टाईल गुंडगिरी; एकेमकांवर सपासप वार; पोलिसांनी काढली धिंड

अकोला ( Akola Crime News ) : अकोला शहरातील कौलखेड परिसरात ‘धुरंधर’ ( Dhurandhar 2 ) चित्रपट बघून गुंडगिरी करणाऱ्या पाच तरुणांना

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातची ईडी चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश