ZP Election Result 2026 : महाराष्ट्र मिनी विधानसभा: जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीची जोरदार मुसंडी, भाजप ठरतोय सर्वात मोठा पक्ष

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ७३१ जिल्हा परिषद जागांपैकी पहिल्या २०० जागांचे कल हाती आले असून, यामध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट वर्चस्व मिळवल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पार पडलेल्या या मतदानामध्ये ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. सुरुवातीच्या कलानुसार, भारतीय जनता पक्षाने ७० जागांवर आघाडी घेत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (३८ जागा) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (४३ जागा) मोलाची साथ दिली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीसाठी सुरुवातीचे कल चिंतेचे ठरणार असे दिसत आहे. यामध्ये काँग्रेस २१ जागांवर आघाडीवर असून, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) अनुक्रमे ६ आणि ३ जागांवर मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. रायगड, पुणे, कोल्हापूर आणि छत्र



सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी


भाजप- ७०
शिवसेना शिंदे गट- ३८
राष्ट्रवादी अजित पवार गट- ४३
काँग्रेस- २१
शिवसेना ठाकरे गट- १४
राष्ट्रवादी शरद पवार गट- ३
इतर- ११



कोकणात महायुतीचा ‘डंका’


महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत कोकण पट्ट्यात महायुतीने विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. प्रत्यक्ष मतमोजणी पूर्ण होण्याआधीच महायुतीच्या तब्बल २७ उमेदवारांनी बिनविरोध विजय संपादन करत विजयाचे खाते उघडले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील ५० सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजपचे ७ आणि शिंदे गटाचा १ असे एकूण ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पंचायत समितीमध्ये तर महायुतीने मोठी मजल मारली असून, १०० पैकी १७ जागा आधीच खिशात घातल्या आहेत. यात भाजपचे १६ सदस्य बिनविरोध निवडून आले असून शिंदे गटाला १ जागा मिळाली आहे. सिंधुदुर्गाप्रमाणेच रायगड आणि रत्नागिरीतही शिवसेनेने (शिंदे गट) बाजी मारली आहे. रायगडच्या महाडमधील सवाने धामणे गणातून अनिल जाधव यांच्याविरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांचा विजय सुकर झाला. रत्नागिरीमध्ये नाणीज पंचायत समिती गणातून डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधकांनी माघार घेतल्याने आणि महायुतीची भक्कम रणनीती यामुळे मतदानापूर्वीच कोकणात महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे.

Comments
Add Comment

अडाणीपणाचा कळस झाला! आशाताईंन ऐवजी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली; ही अभिनेत्री झाली प्रचंड ट्रोल

मुंबई : ९० च्या काळात संपूर्ण मनोरंजन विश्वाला, चाहत्यांना आपल्या आवाजाचे वेड लावणाऱ्या स्वरस्वामींनी आशा भोसले

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी

Ramdas Athawale : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, जोडते दलित सवर्णांची नाती'

बॉर्डरलेस बाबासाहेब आंबेडकर प्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : डॉ.

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे

Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन, मान्यवर आणि चाहत्यांनी घेतले अखेरचे दर्शन

मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे १२ एप्रिल

Asha Bhosle : आज स्वर शांत झाले, स्वर समाधी; सूर सम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

मुंबई : अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि आशा ताईंना शनिवारी तात्काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात