क्षेत्ररक्षण करताना इटलीच्या कर्णधाराचा हात निखळला

मुंबई  : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला शनिवारी ७ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. अनेक मोठ्या संघांची लहान संघांची तारांबळ उडवल्याचे दिसून आले. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सुरूवातीलाच नवख्या संघांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. वर्ल्ड कप सुरू असताना काही खेळाडूंना दुखापतीने ग्रासले आहे. त्यामुळे काहींना संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. चालू सामन्यात क्षेत्ररक्षण करताना चेंडू अडविण्यासाठी झेप घेतल्यामुळे कर्णधाराचा खांदा निखळल्याने त्याला स्पर्धेबाहेर जावे लागले आहे.


इटली आणि स्कॉटलँडमध्ये सामना पार पडला. या सामन्यात इटलीचा ७३ धावांनी पराभव झाला. या सामन्यामध्ये इटलीचा कर्णधार मॅडसेन याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्कॉटलँड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये २०७-४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इटलीचा संघ १६.४ ओव्हरमध्ये १३४ धावा करू शकला. या सामन्यादरम्यान एक वाईट घटना घडली. कर्णधार वेन मॅडसेन याला क्षेत्ररक्षण करत असताना गंभीर दुखापत झाली. चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात त्याने उडी मारली. यादरम्यान तो जोरात खांद्यावर पडला.


सुरूवातीला सर्वांना वाटले नव्हते की ही गंभीर दुखापत असेल. पण जेव्हा तो वेदनेने मैदानावर पडून राहिला. मॅडसेनला पाहण्यासाठी मैदानामध्ये फिजिओथेरपिस्टला आले आणि त्याची विचारपूस केल्यावर त्याला बाहेर घेऊन गेले. त्याचा खांदा निखळल्याची माहिती समोर आली आहे. पॉवर प्लेच्या चौथ्या षटकामध्ये हे घडले. इटली आणि स्कॉटलंडमधील सामना कोलकाता येथील ईडन गार्डनवर पार पडला. इटली संघ पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला होता. मात्र पहिल्याच सामन्यात कॅप्टनला दुखापतीमुळे बाहेर जावे लागले आहे.

Comments
Add Comment

Eng vs Ind: धोनीचा रेकॉर्ड धोक्यात ! आजच्या सामन्यात जॉस बटलरकडे विक्रम मोडण्याची सुवर्ण संधी

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा अंतिम सामना ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे

Wimbledon : विम्बल्डनच्या रॉयल बॉक्समध्ये शुभमन गिलची उपस्थिती; सचिन आणि अंजली तेंडुलकरसोबतचा फोटो व्हायरल

लंडन: क्रिकेट विश्वातील युवा फलंदाज आणि भारतीय कर्णधार शुभमन गिल सध्या लंडनमध्ये असून, त्याने विम्बल्डनच्या

Smriti Mandhana : लॉर्ड्सवर स्मृती मंधानाचा ऐतिहासिक विक्रम! ३०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी भारताची तिसरी महिला क्रिकेटपटू

लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आणखी

Historic Lord's Test : स्मृती मंधानाचा ३०० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा टप्पा; भारतीय महिला क्रिकेटमध्ये नवा विक्रम

लंडन: क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारताची स्टार

Lords Test Ind(w) vs Eng(w) : पहिल्या दिवशी भारताची दमदार फलंदाजी; इंग्लंडची एक विकेट झटपट काढली

लंडन: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंड महिला संघात सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्याच्या

Wimbledon 2026 : विम्बल्डनमध्ये सिनरची दणदणीत एंट्री! जोकोव्हिचचा सरळ सेटमध्ये पराभव; अंतिम फेरीत झ्वेरेव्हशी महामुकाबला

लंडन : विद्यमान विजेता जॅनिक सिनरने (Jannik Sinner) विम्बल्डन २०२६ (Wimbledon 2026) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टेनिसचा महान खेळाडू