मुंबई : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला शनिवारी ७ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. अनेक मोठ्या संघांची लहान संघांची तारांबळ उडवल्याचे दिसून आले. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सुरूवातीलाच नवख्या संघांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. वर्ल्ड कप सुरू असताना काही खेळाडूंना दुखापतीने ग्रासले आहे. त्यामुळे काहींना संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. चालू सामन्यात क्षेत्ररक्षण करताना चेंडू अडविण्यासाठी झेप घेतल्यामुळे कर्णधाराचा खांदा निखळल्याने त्याला स्पर्धेबाहेर जावे लागले आहे.
इटली आणि स्कॉटलँडमध्ये सामना पार पडला. या सामन्यात इटलीचा ७३ धावांनी पराभव झाला. या सामन्यामध्ये इटलीचा कर्णधार मॅडसेन याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्कॉटलँड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये २०७-४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इटलीचा संघ १६.४ ओव्हरमध्ये १३४ धावा करू शकला. या सामन्यादरम्यान एक वाईट घटना घडली. कर्णधार वेन मॅडसेन याला क्षेत्ररक्षण करत असताना गंभीर दुखापत झाली. चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात त्याने उडी मारली. यादरम्यान तो जोरात खांद्यावर पडला.
सुरूवातीला सर्वांना वाटले नव्हते की ही गंभीर दुखापत असेल. पण जेव्हा तो वेदनेने मैदानावर पडून राहिला. मॅडसेनला पाहण्यासाठी मैदानामध्ये फिजिओथेरपिस्टला आले आणि त्याची विचारपूस केल्यावर त्याला बाहेर घेऊन गेले. त्याचा खांदा निखळल्याची माहिती समोर आली आहे. पॉवर प्लेच्या चौथ्या षटकामध्ये हे घडले. इटली आणि स्कॉटलंडमधील सामना कोलकाता येथील ईडन गार्डनवर पार पडला. इटली संघ पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला होता. मात्र पहिल्याच सामन्यात कॅप्टनला दुखापतीमुळे बाहेर जावे लागले आहे.







