Historic Lord's Test : स्मृती मंधानाचा ३०० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा टप्पा; भारतीय महिला क्रिकेटमध्ये नवा विक्रम

लंडन: क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने एक विशेष मैलाचा दगड गाठला आहे. आपल्या कारकिर्दीतील ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून तिने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.



३०० सामन्यांचा 'एलिट क्लब'


स्मृती मंधाना भारतासाठी ३०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी तिसरी महिला क्रिकेटपटू आणि एकूण १२ वी भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या या कामगिरीने भारतीय महिला क्रिकेटच्या प्रगतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.


भारतीय महिला क्रिकेट संघाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे आहे:


















































खेळाडू एकूण सामने कसोटी एकदिवसीय टी-२०
हरमनप्रीत कौर ३७४ १६४ २०२
मिताली राज ३३३ १२ २३२ ८९
स्मृती मंधाना ३०० १२० १७१
झुलन गोस्वामी २८४ १२ २०४ ६८
दीप्ती शर्मा २८० १२४ १४९



स्मृती मंधानाची कारकीर्द एका नजरेत


स्मृती मंधानाने आपल्या आतापर्यंतच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तिने कसोटी क्रिकेटमध्ये २ शतके आणि ४ अर्धशतकांसह ६९१* धावा केल्या आहेत. त्याचबरोबर, एकदिवसीय सामन्यांत १४ शतके आणि ३५ अर्धशतकांसह ५४११ धावांचा डोंगर उभारला आहे. टी-२० फॉरमॅटमध्येही तिने १ शतक आणि ३५ अर्धशतके झळकावून ४५३८ धावा केल्या आहेत.


तिची ही कामगिरी केवळ आकडेवारी नसून, भारतीय महिला क्रिकेटच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक आहे.

Comments
Add Comment

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,

Hockey World Cup 2026 : हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखत भारताची पुढील फेरीत वाटचाल

हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये गुरुवारी भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये डी गटातील अखेरचा साखळी सामना रंगला. अत्यंत

Cricket Match-Fixing : कॅनडावरील मॅच फिक्सिंगच्या आरोपांनंतर मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाईंचा राजीनामा

नवी दिल्ली : कॅनडाच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १

Joe Root Test Stats : १३ धावा अन् महाविक्रम! जो रूट करणार सचिन तेंडुलकरची बरोबरी ?

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट (Joe Root) एका ऐतिहासिक टप्प्यावर