मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांची उमेदवारी जाहीर; महापालिका राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात

मुंबई विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका राजकारणात मोठी आणि निर्णायक घडामोड घडली. शहराच्या नेतृत्वाच्या शिखरावर कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले असतानाच प्रभाग १३२ च्या नगरसेविका आणि भाजप महिला मोर्चा संयोजिका रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.



महापालिकेतील भाजप पक्ष कार्यालयात पार पडलेल्या नगरसेवकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नगरसेविका रितू तावडे यांचे नाव महापौर पदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केले. तावडे यांच्या नावाची घोषणा करताच उपस्थित नगरसेवकांनी जोरदार टाळ्या वाजवत पक्षाच्या या निर्णयाचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. भाजपच्या या पहिल्या महिला महापौर असून केल्याने राजकीय वर्तुळात उत्साहाची लाट निर्माण केली. या घोषणेमुळे सहकारी नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.


घोषणेनंतर तावडे यांनी पक्षाने सोपवलेली जबाबदारी विश्वासाने पेलण्यासाठी पुढे पक्षाचा विश्वास अधिक दृढ करण्याचां निर्धार व्यक्त करत जय श्रीराम...भारत माता की जय... वंदे मातरम्... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो.. भारतीय जनता पार्टीचा... देवा भाऊ आहे बढो .. अमित साटम आगे बढो.. या घोषणांच्या गजरात आपला उमेदवारी अर्ज महापालिका सचिव मंजिरी देशपांडे यांच्याकडे अधिकृतपणे सादर केला. याप्रसंगी महापालिका गटनेते गणेश खणकर, उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा..माजी खासदार मनोज कोटक.ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, शिवसेनेचे गटनेते अमेय घोले, तसेच महायुतीचे नगरसेवक उपस्थित होते.


महापौर पदासाठी ही उमेदवारी ही मुंबईच्या विकासाच्या आणि सक्षम नेतृत्वाच्या दृष्टीने महत्त्वाची महत्वाची मानली जात असून सातम यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानत त्यांच्या विश्वास मुंबईच्या विकासाचा रथ जलदगतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करत सार्थ ठरवेन अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.


दरम्यान, उपमहापौर पदासाठीही एक महत्त्वपूर्ण नाव पुढे आले असून दहिसरमधील नगरसेवक संजय घाडी यांची शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी घाडी यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, हा कालावधी अडीच वर्षाऐवजी सेवा वर्षांचा असेल असे जाहीर केले. त्यानंतर महायुतीच्या सर्व नगरसेवकांसोबत जात त्यांनी उपमहापौर पदाचा आपला उमेदवारी अर्ज महापालिका सचिव मंजिरी देशपांडे यांच्याकडे सादर केला.



रितू तावडे यांचा परिचय


रितू तावडे या घाटकोपर पूर्व मधील प्रभाग १३२मधून निवडून आल्या आहेत. सन २०१२मध्ये प्रथम निवडून आल्यांनतर शिक्षण समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. आक्रमक आणि अभ्यासू असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. नगरसेवक काळात दुकानांबाहेर महिलांचे कपडे प्रदर्शित केले जाणारे पुतळे अर्थात मॅनीक्विन हटवण्याची जोरदार मागणी त्यांनी आपल्या नगरसेवक काळात केली होती, तसेच सध्या मुंबई भाजपाच्या महिला संयोजिका


संजय घाडी यांचा परिचय


संजय घाडी हे मागाठने विधानसभेतील नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. पूर्वी शिवसेना आणि त्या नंतर मनसेमध्ये आणि पुन्हा उबाठा शिवसेना आणि तिथून पुन्हा शिवसेना असा त्यांचा प्रवास आहे. मागील काळात त्यांनी स्थायी समिती सदस्यत्व भूषवले होते.

Comments
Add Comment

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त

मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला. निकालानंतर महायुतीचाच महापौर

अजित पवारांच्या खासगी सचिवाची कसून चौकशी

मुंबई : अजित पवारांचे बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमान अपघातात निधन झाले. या प्रकरणी राज्याच्या गुन्हे

Mumbai Local : वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक; तिन्ही मार्गांवर लोकल फेऱ्या रद्द

मुंबई : रेल्वे रुळांची देखभाल आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी उद्या, रविवारी मुंबईच्या तिन्ही मुख्य