परिणामकारक महसूल सेवेसाठी राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधने

मुंबई : महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ इतर विभाग किंवा महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर जात असल्याने मूळ विभागातील कामकाजावर परिणाम होतो. यापुढे महसूल विभागातील अधिकाऱ्याला एकदा प्रतिनियुक्ती पूर्ण केल्यानंतर पुन्हा प्रतिनियुक्तीवर जाण्यापूर्वी मूळ विभागात किमान ३ वर्षे सेवा देणे बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.


प्रशासकीय शिस्त आणि जनतेची सोय : महसूल, नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक आणि भूमी अभिलेख यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या उपविभागांतील अधिकारी मोठ्या प्रमाणात प्रतिनियुक्तीवर जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. वरिष्ठ स्तरावरील पदे रिक्त राहिल्याने सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या सेवांवर त्याचा थेट परिणाम होतो आणि प्रशासकीय कामकाज विस्कळीत होते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी महसूल विभागाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.


नवीन नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे :


१. अधिकाऱ्यांना सुरुवातीला जास्तीत जास्त ३ वर्षांसाठीच प्रतिनियुक्तीवर जाता येईल.
२. प्रतिनियुक्ती संपल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने मूळ विभागात किमान ३ वर्षे काम करणे आवश्यक आहे. या कालावधीशिवाय त्यांच्या पुढील प्रतिनियुक्तीचा विचार केला जाणार नाही.
३. हे नियम अपर जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि भूमी अभिलेख विभागातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांना लागू असतील.
४. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असेल. त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी मुख्यमंत्र्यांची विशेष मान्यता आवश्यक राहील.
५. अपवादात्मक परिस्थितीत मूळ विभागाच्या मान्यतेने केवळ १ वर्षाची मुदतवाढ मिळू शकेल.

Comments
Add Comment

Bhimashankar : ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे परिसराचे होणार परिवर्तन

मुंबई : भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात

Legal notice served to Amazon : महान गणितज्ञ ‘आर्यभट्ट’ यांच्या विडंबन प्रकरणी ॲमेझॉन इंडियाला कायदेशीर नोटीस!

मुंबई : प्राचीन भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ 'आर्यभट्ट' यांचे व्यावसायिक जाहिरातीत अत्यंत हीन

Mumbai pune housing projects : महामुंबईतील २ लाख घरांचे स्वप्न 'रखडणार'? युद्धामुळे बांधकाम क्षेत्रासमोर मोठे संकट

Mumbai : चालू वर्षात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो घरखरेदीदारांसाठी एक

Navi Mumbai Crime : ऑनलाइन गेमिंगच्या नादात रिक्षाचालकाची सव्वाकोटींची फसवणूक, तर मंदिरात पुजाऱ्याचाच चोरीचा प्रयत्न

Navi Mumbai : नवी मुंबई परिसरात गुन्हेगारीच्या दोन वेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. एका घटनेत ऑनलाइन गेमिंगच्या

BKC : सकाळची वाहतूक सुरळीत; पण सायंकाळी पुन्हा कोंडीचेच चित्र

Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) वाहतूककोंडीवर उपाय

Narayan Seva Sanstha : नारायण सेवा संस्थेकडून मुंबईच्या वडाळा येथील निको हॉलमध्ये १०४ दिव्यांगांना १५४ कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप

मुंबई : दिव्यांगजनांचे पुनर्वसन, आरोग्य सेवा आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी समर्पित असलेल्या भारतातील अग्रगण्य