Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक घेतला आहे. मध्ये रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवरछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेने सांताक्रुझ आणि गोरेगाव दरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी १५.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते विद्याविहार दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव व कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ व भायखळा स्थानकांवर थांबतील.


हार्बर लाईन


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / बांद्रा (डाऊन)


वेळ: सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत


चुनाभट्टी / बांद्रा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (अप)


वेळ: सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत


कुठे : पनवेल / बेलापूर / वाशी


कधी : सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२०


कुठे : गोरेगाव ते बांद्रा


कधी : सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३


या कालावधीत लोकल सेवा रद्द :


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील हार्बर सेवा रद्द राहतील.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत बांद्रा / गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या