सलामीवीर अभिषेक शर्मा केला भलताच विक्रम

मुंबई : टी ट्वेंटी विश्वचषकातील भारताचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून अमेरिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारताच्या सलामीवीर अभिषेक शर्माने अनपेक्षित अशी कामगिरी केली. यामुळे त्याच्या नावावर भलत्याच विक्रमाची नोंद झाली आहे.


भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर शून्य धावा करून बाद झाला. अली खानच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अभिषेक झेलबाद झाला. हा अभिषेक शर्माचा टी ट्वेंटी विश्वचषकातील पहिलाच सामना होता. पण या सामन्यात प्रभावी कामगिरी करणे त्याला जमले नाही.


अभिषेक शर्मा टी ट्वेंटी विश्वचषकात पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद होणारा पाचवा भारतीय खेळाडू झाला. या यादीत आधीपासूनच गौतम गंभीर, आशीष नेहरा, शार्दुल ठाकूर आणि दीपक हुडा आहेत. भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात २० षटकांत नऊ बाद १६१ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने शून्य, ईशान किशनने २०, तिलक वर्माने २५, सूर्यकुमार यादवने नाबाद ८४, शिवम दुबेने शून्य, रिंकू सिंगने ६, हार्दिक पांड्याने ५, अक्षर पटेलने १४, अर्शदीप सिंहने ४, वरुण चक्रवर्तीने नाबाद शून्य धावा केल्या आहेत.


सूर्यकुमारचा झंझावात


सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत चार षटकार आणि दहा चौकार मारत नाबाद ८४ धावा केल्या. सूर्याच्या झंझावातामुळेच भारताचे बाकीचे फलंदाज मोठी कामगिरी करू शकले नाही तरी भारतीय संघाने १५० धावांचा टप्पा पार केला.


भारत : ईशान किशन (यष्टीरक्षक) , अभिषेक शर्मा , तिलक वर्मा , सूर्यकुमार यादव (कर्णधार) , रिंकू सिंग , हार्दिक पांड्या , शिवम दुबे , अक्षर पटेल , वरुण चक्रवर्ती , अर्शदीप सिंग ,मोहम्मद सिराज


अमेरिका : अँड्रीस गॉस (यष्टीरक्षक) , सैतेजा मुक्कामल्ला , मोनंक पटेल (कर्णधार) , मिलिंद कुमार , संजय कृष्णमूर्ती , शुभम रांजणे , हरमीत सिंग , मोहम्मद मोहसीन , शॅडली व्हॅन शाल्कविक , अली खान , सौरभ नेत्रावलकर

Comments
Add Comment

ICC Hall of Fame : सौरव गांगुली आणि अंजुम चोप्राचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज, माजी पुरुष कर्णधार सौरव गांगुली आणि माजी

FIFA World Cup : फिफा वर्ल्ड कप गाजवून दक्षिण अफ्रिकाचा खेळाडू मायदेशी परतला पण...

जोहान्सबर्ग : फिफा विश्वचषक २०२६ मध्ये दमदार कामगिरी करून चर्चेत आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा युवा फुटबॉलपटू जेडन

Ind vs Zim : बीसीसीआयची मोठी घोषणा! इंग्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात बदल

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिका ४-० ने गमावल्यानंतर भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.

Healther Knight : भारताविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीनंतर हिथर नाइटची निवृत्ती; इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप !

लंडन : इंग्लंड महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार हिथर नाइट हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून

FIFA World Cup 2026 : स्वित्झर्लंडचा धूव्वा उडवत अर्जेंटिनाने केला सहाव्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश; शेवटच्या क्षणी फिरला सामना !

मिसूरी: अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज (१२ जुलै) पार पडला. या सामन्यात

IND vs ENG : चॅम्पियन संघाचा खेळ असा का घसरला? श्रेयसच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा सलग पराभव; ड्रेसिंग रूमपासून निवडीपर्यंत नेमकं काय चुकलं?

टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा मान पटकावल्यानंतर भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यानंतरच्या आयर्लंड