FIFA World Cup : फिफा वर्ल्ड कप गाजवून दक्षिण अफ्रिकाचा खेळाडू मायदेशी परतला पण...

जोहान्सबर्ग : फिफा विश्वचषक २०२६ मध्ये दमदार कामगिरी करून चर्चेत आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा युवा फुटबॉलपटू जेडन अ‍ॅडम्स याचे अवघ्या २५ व्या वर्षी निधन झाले आहे. विश्वचषकानंतर मायदेशी परतलेल्या अ‍ॅडम्सच्या अकाली मृत्यूने संपूर्ण फुटबॉल विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अजूनही त्याच्या निधनाचे नेमकं कारण समोर आले आहे. (Fifa World Cup 2026)



जेडन अ‍ॅडम्सने क्लब फुटबॉलमध्ये मामेलोडी सनडाउन्स संघाकडून सातत्यपणे चांगली कामगिरी करत स्वताची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्या योगदानामुळे संघाने CAF चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले होते. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेच्या फिफा विश्वचषक संघात संधी देण्यात आली होती. विश्वचषकातही अ‍ॅडम्सने प्रभावी खेळ करत दक्षिण आफ्रिकेला नॉकआऊट फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, राऊंड ऑफ ३२ मध्ये कॅनडाविरुद्ध इंज्युरी टाइममध्ये गोल स्वीकारावा लागल्याने दक्षिण आफ्रिकेचा १-० असा पराभव झाला आणि त्यांचा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.



अ‍ॅडम्सचे मार्गदर्शक ब्रेंडिन जॉन्सन यांनी त्याच्या निधनावर शोक व्यक्त करत सांगितले की, विश्वचषकातून परतल्यानंतर जेडन खूप उत्साही होता. नवीन हंगामासाठी तो सज्ज होता आणि आपल्या कारकिर्दीत आणखीन एक मोठी झेप गेण्यासाठी सज्ज झाला होता. त्याच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. विश्वचषकादरम्यानही अ‍ॅडम्सवर वैयक्तिक दुःखाचा डोंगर कोसळला होता. स्पर्धेदरम्यान त्याच्या आजीचे निधन झाले होते. तरीही त्याने देशासाठी खेळण्याचा निर्णय घेत आपल्या व्यावसायिक वृत्तीचे उदाहरण घालून दिले.दरम्यान, जेडन अ‍ॅडम्सच्या मृत्यूचे कारण अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याच्या अचानक झालेल्या निधनाबाबत विविध चर्चांना उधाण आले असले तरी, अधिकृत माहितीची सर्वजण प्रतीक्षा करत आहेत.

Comments
Add Comment

BWF World Championship : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंदला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक

नवी दिल्ली : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला जोडीला जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत सारंश जैनला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून कोलंबो येथे

Women's Hockey World Cup : भारतीय महिला हॉकी संघाचा नेदरलँड्सकडून पराभव, उपांत्य फेरीच्या आशांना धक्का

ॲमस्टेलवीन : महिला हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत, भारतीय महिला हॉकी संघाला गतविजेत्या ऑलिम्पिक आणि

IND vs SL 2nd Test : कुलदीप यादवला डच्चू? एका खेळाडूचे पदार्पण; श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची Playing XI

IND vs SL 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १६५ धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांच्या

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा बांगलादेशवर कहर; अवघ्या २२ चेंडूत अर्धी टीम गारद, डेल स्टेनलाही टाकलं मागे

Aus vs Ban 2nd Test Match : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मॅके येथे खेळवला जात आहे. पहिल्या

Neeraj Chopra : लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सीझनमधील सर्वोत्तम थ्रो; अवघ्या ९ सेंटीमीटरने हुकलं सुवर्णपदक

नवी मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League)