FIFA World Cup 2026 : स्वित्झर्लंडचा धूव्वा उडवत अर्जेंटिनाने केला सहाव्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश; शेवटच्या क्षणी फिरला सामना !

मिसूरी: अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज (१२ जुलै) पार पडला. या सामन्यात अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला ३-१ ने पराभूत करून फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयासह, अर्जेंटिनाने फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सहाव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा विक्रम केला आहे. आता फिफा विश्वचषक २०२६ मध्ये १५ आणि १६ जुलै रोजी दोन महत्त्वाचे सामने होणार आहेत. पहिल्या सामन्यात स्पेनचा सामना फ्रान्सशी होईल, तर दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिना स्वित्झर्लंडविरुद्ध लढेल.(FIFA)




मेस्सीचे नवे विक्रम


अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू मेस्सीला या सामन्यात एकही गोल करता आले नाही तरी त्याने फुटबॉल विश्वात एक नवा इतिहास रचला आहे. या सामन्यात मेस्सीने १० व्या मिनिटाला अलेक्सिस मॅक अलिस्टरला असिस्ट देत फिफा विश्वचषकात नवा विक्रम रचला आहे. मेस्सीचा हा त्याच्या फिफा वर्ल्ड कप करियरमधील १० वा असिस्ट होता. तो फिफा वर्ल्ड विश्वचषकाच्या इतिहासात १० असिस्ट करणार पहिला खेळाडू बनला आहे.




असा फिरला सामना


सामना १-१ अशा बरोबरीत सुटल्याने मॅच एक्स्ट्रा टाईममध्ये गेली. फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाचा हा १३ वा एक्स्ट्रा टाईम होता. एक्स्ट्रा टाईमच्या दुसऱ्या हाफमध्ये बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या ज्यूलियन अल्वारेझने जोश लोपेझच्या पासवर गोल करत अर्जेंटिनाला २-१ अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. हा गोल सामना फिरवणारा ठरला.त्यानंतर सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना आणखी एक बदली खेळाडू लौतारो मार्टिनेझ याने पेनल्टी एरियाच्या बाहेरून उत्कृष्ट शॉट मारत तिसरा गोल केला आणि अर्जेंटिनाचा ३-१ असा विजय मिळवून दिला.

Comments
Add Comment

Commonwealth Games 2026 : ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतानं जिंकली ३९ पदकं, समारोप सोहळ्यात दिसेल अहमदाबाद २०३० ची झलक

ग्लासगो : स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरात सुरू असलेल्या राष्ट्रकुल २०२६ अर्थात

Commonwealth Games 2026 : भूसुरुंगाच्या स्फोटात पाय गमावला, पण जिद्द सोडली नाही; बॉक्सर ते सुवर्णपदक विजेता ठरलेला सोमन राणा

ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आपल्या प्रेरणादायी प्रवासातून संपूर्ण

Jadumani Singh : फुटबॉलप्रेमी जादुमणी काकाच्या सल्ल्याने बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरला आणि...

ग्लासगो : स्कॉटलँडच्या ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल २०२६ अर्थात कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) २०२६ स्पर्धेत

Commonwealth Games 2026 : रोजंदारी मजुराचा मुलगा बनला देशाचा अभिमान; प्रवीण चित्रवेलने तिहेरी उडीत पटकावले ऐतिहासिक रौप्य पदक

ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंनी आपल्या अफाट संघर्षमय प्रवासातून

Commonwealth Games 2026 : भीषण अपघातात पाय गमावला, पण जिद्द नाही! सुवर्ण-रौप्य दुहेरी पराक्रम गाजवला

 शुभम जुयालची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची ऐतिहासिक कमाई ग्लास्गो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल

Commonwealth Games 2026 : रुग्णालयाच्या बिछान्यापासून सुवर्ण विजयापर्यंत; जास्मिन लंबोरियाने रचला इतिहास

ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी आपला दरारा कायम राखत भारताची मान अभिमानाने