ICC Hall of Fame : सौरव गांगुली आणि अंजुम चोप्राचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज, माजी पुरुष कर्णधार सौरव गांगुली आणि माजी महिला कर्णधार अंजुम चोप्रा, यांना प्रतिष्ठित आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यालाही या सन्मानाने गौरविण्यात आले  आहे. स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे आयोजित केलेल्या एका भव्य समारंभात ही घोषणा करण्यात आली आहे. (ICC  Hall of Fame)






आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी तिन्ही क्रिकेटपटूंचे अभिनंदन केले आणि म्हणाले की, हा सन्मान अशा क्रिकेटपटूंना दिला जातो ज्यांनी आपल्या कामगिरी आणि योगदानाने क्रिकेटला नव्या उंचीवर नेले आहे. ते म्हणाले, सौरव गांगुली, अंजुम चोप्रा (Anjum Chopra) आणि केविन पीटरसन यांनी आपापल्या देशांचे उल्लेखनीय कौशल्याने नेतृत्व केले आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाल्यामुळे, त्यांची कामगिरी येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.सौरव गांगुलीने आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात खास क्षणांपैकी एक आहे. गांगुली म्हणाला, आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळणे हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे. क्रिकेटच्या महान क्रिकेटपटूंमध्ये माझे नाव पाहणे ही माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची बाब असेल. भारताचे प्रतिनिधित्व करणे हा एक बहुमान होता आणि आता अशा प्रकारे सन्मानित होणे हा एक खूप खास अनुभव आहे. त्याने आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांचे आभार मानले आणि सांगितले की, हा कोणत्याही क्रिकेटपटूला मिळू शकणारा सर्वोच्च सन्मान आहे. त्याने भविष्यातही क्रिकेटची सेवा करत राहण्याची इच्छा व्यक्त केली.(Saurav Ganguly)






भारतीय महिला संघाची माजी कर्णधार आणि सध्याची क्रिकेट समालोचक अंजुम चोप्रा म्हणाली की, "लहानपणापासूनच तिने भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले होते आणि आज क्रिकेटच्या महान खेळाडूंमध्ये सन्मानित होणे ही तिच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ती म्हणाली, भारतीय जर्सी परिधान करणे ही माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची बाब राहिली आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणे, हे माझ्या कारकिर्दीला आकार देणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांना मिळालेली पोचपावती आहे. मी त्या सर्वांची आभारी आहे". (Indian Cricket Team)

Comments
Add Comment

Continental Tour Silver : भालाफेकीत रोहित यादवचा सुवर्णवेध; मुरली श्रीशंकरची ‘लांब उडी’, महिला १०० मीटरमध्ये भारताचा क्लीन स्वीप

भुवनेश्वर : भारताच्या अॅथलेटिक्सपटूंनी वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर सिल्व्हर लेव्हल स्पर्धेत दमदार

BWF World Championship : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंदला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक

नवी दिल्ली : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला जोडीला जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत सारंश जैनला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून कोलंबो येथे

Women's Hockey World Cup : भारतीय महिला हॉकी संघाचा नेदरलँड्सकडून पराभव, उपांत्य फेरीच्या आशांना धक्का

ॲमस्टेलवीन : महिला हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत, भारतीय महिला हॉकी संघाला गतविजेत्या ऑलिम्पिक आणि

IND vs SL 2nd Test : कुलदीप यादवला डच्चू? एका खेळाडूचे पदार्पण; श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची Playing XI

IND vs SL 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १६५ धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांच्या

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा बांगलादेशवर कहर; अवघ्या २२ चेंडूत अर्धी टीम गारद, डेल स्टेनलाही टाकलं मागे

Aus vs Ban 2nd Test Match : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मॅके येथे खेळवला जात आहे. पहिल्या