IND vs ENG : चॅम्पियन संघाचा खेळ असा का घसरला? श्रेयसच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा सलग पराभव; ड्रेसिंग रूमपासून निवडीपर्यंत नेमकं काय चुकलं?

टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा मान पटकावल्यानंतर भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यानंतरच्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी पूर्णपणे निराशाजनक ठरली. आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका २-० आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धची मालिका तब्बल ४-० अशा फरकाने गमावल्याने भारतीय संघाच्या रणनीती, नेतृत्व आणि संघनिवडीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (IND vs ENG)


विश्वचषकानंतर नेतृत्वात बदल करत सूर्यकुमार यादवऐवजी श्रेयस अय्यरकडे टी-20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. मात्र अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताला अद्याप एकही टी-20 सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे कर्णधार म्हणून त्याच्या निर्णयक्षमतेसोबतच प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या रणनीतीवरही चर्चा सुरू झाली आहे. (IND vs ENG)



सलामीच्या जोडीतील सततचे बदल ठरले महाग :


विश्वचषकात भारताला दमदार सुरुवात करून देणारी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामीची जोडी कायम ठेवण्याऐवजी संघ व्यवस्थापनाने वारंवार प्रयोग केले. संजू सॅमसन तीन सामन्यांत अपयशी ठरताच त्याच्या जागी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली. मात्र वैभवलाही अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर पुन्हा संजूचे पुनरागमन झाले. या सततच्या बदलांमुळे सलामीची जोडी स्थिरावलीच नाही आणि भारताला एकाही सामन्यात मजबूत सुरुवात मिळू शकली नाही. (IND vs ENG)



मिडल ऑर्डरचा फ्लॉप शो :


इशान किशन, तिलक वर्मा आणि इतर मधल्या फळीतील फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. काही खेळाडूंना चांगली सुरुवात मिळाली, मात्र ती मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करण्यात ते वारंवार अपयशी ठरले. परिणामी भारताच्या डावाला अपेक्षित गती मिळाली नाही. (IND vs ENG)



फिनिशरची कमतरता प्रकर्षाने जाणवली :


टी-20 क्रिकेटमध्ये शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा करणारा फिनिशर हा विजयाचा महत्त्वाचा घटक असतो. ही जबाबदारी शिवम दुबेवर होती. मात्र त्याला एकाही सामन्यात प्रभावी फिनिशरची भूमिका बजावता आली नाही. त्यामुळे अनेक सामने भारताच्या हातातून निसटले. (IND vs ENG)



संघरचनेतील असंतुलन ठरले घातक :


आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात भारताच्या टॉप ऑर्डरमध्ये डावखुऱ्या फलंदाजांची संख्या अधिक होती. त्यामुळे लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनचा अभाव स्पष्टपणे जाणवला. विरोधी संघांनी त्याचा पुरेपूर फायदा घेत गोलंदाजीची आखणी केली. (IND vs ENG)



स्पिन आणि डेथ बॉलिंगमध्ये मोठी पोकळी :


या दोन्ही मालिकांमध्ये रवी बिष्णोई हा एकमेव प्रमुख स्पिनर होता, तर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात होते. इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजीविरुद्ध भारताकडे विकेट घेणारा प्रभावी स्पिनर नसल्याचे स्पष्ट दिसून आले. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत डेथ ओव्हर्समध्ये अर्शदीप सिंगकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र आयपीएलपासून सुरू असलेला त्याचा खराब फॉर्म या दौऱ्यातही कायम राहिला. शेवटच्या षटकांमध्ये भारताला धावा रोखण्यात वारंवार अपयश आले. (IND vs ENG)



फिल्डिंगनेही वाढवल्या अडचणी :


सोपे झेल सोडणे, चुकीची थ्रो आणि मैदानावरील समन्वयाचा अभाव यामुळे भारतीय संघाला मोठी किंमत मोजावी लागली. आधुनिक टी-20 क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फिल्डिंग ही विजयाची गुरुकिल्ली मानली जाते, मात्र भारत या विभागातही मागे पडला. (IND vs ENG)



ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही आलबेल आहे का?


पराभवांच्या मालिकेनंतर आता ड्रेसिंग रूममधील वातावरणावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील समन्वयाबाबत चर्चांना उधाण आले आहे. आयपीएलमध्ये गंभीर आणि श्रेयस यांच्या जोडीने कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिले होते. मात्र त्या यशाचे बहुतांश श्रेय गंभीर यांनाच मिळाल्याची चर्चा होती. त्यानंतर श्रेयसने केकेआरची साथ सोडली आणि दोघांमधील संबंध पूर्वीसारखे राहिले नसल्याच्या चर्चाही वारंवार रंगल्या. या पार्श्वभूमीवर सध्याच्या भारतीय संघातील निर्णयप्रक्रिया आणि ड्रेसिंग रूममधील वातावरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (IND vs ENG)



आता पुढे काय?


सलग सहा टी-20 सामन्यांतील पराभवानंतर भारतीय संघ व्यवस्थापनासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. संघनिवडीत सातत्य, योग्य फलंदाजी क्रम, डेथ बॉलिंगसाठी विश्वासार्ह पर्याय, प्रभावी स्पिन आक्रमण आणि कर्णधार-प्रशिक्षक यांच्यातील स्पष्ट समन्वय या बाबींवर तातडीने काम करावे लागणार आहे. अन्यथा विश्वविजेत्या भारतीय संघाची घसरगुंडी पुढील मोठ्या स्पर्धांमध्येही कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (IND vs ENG)

Comments
Add Comment

Wimbledon 2026 Linda Nosková : २१ वर्षीय लिंडा नोस्कोव्हाचा विम्बल्डनवर ऐतिहासिक कब्जा! चेक अंतिम लढतीत मुचोव्हाचा पराभव करत पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद

विम्बल्डन २०२६ महिला एकेरी स्पर्धेत २१ वर्षीय चेक टेनिसपटू लिंडा नोस्कोव्हा (Wimbledon 2026 Linda Nosková) हिने शानदार कामगिरी

FIFA World Cup 2026 : व्हीएआरच्या निर्णयाने पलटला सामना! एर्लिंग हालंडच्या चुकीमुळे नॉर्वेचा गोल रद्द

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) स्पर्धेतील इंग्लंड (England) आणि नॉर्वे (Norway) यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील

IND vs ENG 5th T20I : भारताचा पुन्हा पराभव, इंग्लंडने अखेरचा सामना जिंकत मालिका ४-० ने गाजवली

साउथॅम्प्टन : भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय (T20 International) मालिकेतील (Series)

IND (W) vs ENG (W) : भारतीय महिला संघाचा इंग्लंडला जोरदार दणका; दुसऱ्या दिवसाअखेर सामन्यावर घट्ट पकड

लॉर्ड्स : लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या भारत महिला (IND Women) आणि इंग्लंड महिला (ENG Women) यांच्यातील ऐतिहासिक कसोटी (Test)

FIFA World Cup 2026 : बेलिंगहॅम ठरला गेमचेंजर! अतिरिक्त वेळेत इंग्लंडचा नॉर्वेवर २-१ असा विजय

FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्ड कपमध्ये २०२६ (FIFA World Cup 2026) इंग्लंडने नॉर्वेचा २-१ असा पराभव करत उपांत्य फेरीत (Semi-final) प्रवेश केला. या

Eng vs Ind: धोनीचा रेकॉर्ड धोक्यात ! आजच्या सामन्यात जॉस बटलरकडे विक्रम मोडण्याची सुवर्ण संधी

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा अंतिम सामना ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे