ऑनलाईन गेम खेळणाऱ्या तीन अल्पवयीन बहि‍णींची धक्कादायक कृती

गाझियाबाद : ऑनलाईन गेम खेळणाऱ्या तीन अल्पवयीन बहि‍णींनी एक धक्कादायक कृती केली. या तीन अल्पवयीन बहि‍णींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. या धक्कादायक घटनेत तिघींचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये टिला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी परिसरात ही घटना घडली आहे.



घरच्यांनी तिघींच्या सतत ऑनलाईन गेम खेळण्यावर आक्षेप घेतला. यामुळे निराश झालेल्या तीन अल्पवयीन बहि‍णींनी टोकाचा निर्णय घेतला. मृत मुलींचे वय अनुक्रमे बारा, चौदा आणि सोळा होते.


टोकाचा निर्णय घेणाऱ्या मुली टिला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी परिसरातल्या भारत सिटीमध्ये वास्तव्यास होत्या. मुलींनी एकदम टोक गाठल्याचे बघून पोलीस पण चक्रावले आहेत. या धक्कादायक घटनेचा पोलीस तपास सुरू आहे. मुलींनी टोकाचा निर्णय घेण्यामागे फक्त ऑनलाईन गेम खेळण्यावर घेतलेला आक्षेप एवढेच कारण आहे की अन्य काही बाब आहे याचाही तपास पोलीस करत आहेत. सर्व शक्यतांचा विचार करून तपास केला जाईल आणि दोषींविरोधात कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.


मुलींनी बुधवार ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. याआधी नेमके काय घडले याचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मुली ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याचा कोरियन लव्हर हा गेम खेळत होत्या.


प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार तिघी बहिणी बाल्कनीत आल्या. आधी एकीने उडी मारली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोघींचाही मृत्यू झाला. तिघीजणी नवव्या मजल्यावरुन एकदम खाली जमिनीवर कोसळल्या. काय घडले आहे याची जाणीव होताच प्रत्यक्षदर्शीने मदत मागवली. पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन करून बोलावण्यात आले. मुलींनी उडी मारण्याआधी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. या चिठ्ठीत वडिलांची माफी मागत एका डायरीचा उल्लेख करण्यात आला आहे. डायरीत सर्व सत्य कथन केल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. यामुळे पोलिसांनी डायरी ताब्यात घेतल्याचे समजते.


मुलींच्या वडिलांनी दोन वेळा लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून बराच काळ मूल झाले नाही म्हणून तिच्याच सख्ख्या बहिणीशी त्यांनी लग्न केले होते. यामुळे कौटुंबिक पातळीवर नेमके काय घडले याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

पुण्यातून मोठी अपडेट समोर; वसंत मोरेंना अटक होण्याची शक्यता

पुणे: पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते वसंत मोरे

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज