Eknath Shinde : आशाताईंनी स्वर समाधी घेतली! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

चंद्र-सूर्य आहेत तोवर आशाताईंची गाणी अजरामर राहतील


मुंबई : लता दीदी, आशा ताई आणि मंगेशकर कुटुंबाकडून सिने इंडस्ट्रीला मिळालेली गाणी ही अजरामर आहेत. हृदयविकाराचा झटका आला आणि शनिवारी तात्काळ आशा ताईंना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेत असताना रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा ताईंना श्वाहिली श्रद्धांजली


ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी संगीत क्षेत्रात हिमालया एवढं उत्तुंग काम करुन ठेवलंय, जे कुठल्याही फूटपट्टीने मोजता येणार नाही. आशाताई महाराष्ट्राच्या शान होत्या आणि मराठी अस्मितेच्या मानबिंदू होत्या. आशाताईंचे निधन नाही तर त्यांनी स्वर समाधी घेतली, अशा शब्दांत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली.



">उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आशाताईंनी मराठी आणि हिंदीच नाही तर तामिळ, मल्याळम, इंग्रजी, रशियन अशा जवळपास २० भाषांमधील गाणी गायली. सुख-दु:खात त्यांची गाणी ऐकायचो. खासकरुन दु:खाच्या प्रसंगी त्यांची गाणी आधार वाटतात. आजही त्यांनी गायलेली हजारो गाणी कालची ताजी गाणी असल्याचा भास होतो. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत आशाताईंची गाणी अजरामर राहतील आणि संगीत प्रेमींना आनंद देत राहतील, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.



आशा ताईंना अनेक पुरस्कार मिळाले पण मुख्यमंत्री असताना त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचे संधी मला मिळाली, याबद्दल मी भाग्यवान समजतो, असे ते म्हणाले. आशाताईंनी लाडकी बहिण योजनेचे कौतुक केले होते. १५०० रुपयांचे मोल किती आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यांच्या सुरुवातीच्या काळात ही योजना हवी होती, असेही आशाताई म्हणाल्या होत्या. कारण त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी गरिबीचे चटके सहन केले होते, अशी आठवण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवली. या दु:खद प्रसंगातून सावरण्याचे त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो, आशाताईंना शिवसेना पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Tags
Eknath ShindeBollywood SongsRenowned playback singer Asha BhosleAsha Bhosle Heart AttackAasha bhosleAsha bhosle passes awayAsha Bhosle Funeral
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई

BMC News : डॉ.भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या देखभालीची जबाबदारी इंटॅकवरच; करार संपून आठ वर्षांचा लोटला कालावधी

नवीन संस्थेची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरु https://prahaar.in/2026/08/14/46-trees-affected-by-the-redevelopment-of-ramabai-and-kamraj-nagar-in-ghatkopar-mmrda-to-plant-955-trees/ मुंबई (विशेष

MMRDA : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरच्या पुनर्विकासात ४६ झाडे बाधित; एमएमआरडीएकडून ९५५ झाडे लावून घेतली जाणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरमधील झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी हाती घेण्यात

Train MegaBlock : पश्चिम रेल्वेचा वीकेंडला बोरिवली-भाईंदर दरम्यान जंबो ब्लॉक; गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर

मुंबई:

BMC NEWS : मुंबई-३ जलवाहिनीला ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मोठी गळती; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या ३००० मिलीमीटर