वैभववाडी तालुक्यात उबाठाला खिंडार

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित कोकिसरे येथील असंख्या कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल


वैभववाडी : कोकिसरे येथील उबाठाचे पदाधिकारी दत्ताराम गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत वैभववाडी येथे हा पक्षप्रवेश पार पडला. दत्ताराम गुरव व कार्यकर्त्यांचा प्रवेश उबाठासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे यांनी सर्व प्रवेश करणाऱ्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.


प्रवेश करणाऱ्यांमध्ये कोकिसरे माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन पोरलेकर, कुंभारवाडीचे अध्यक्ष सदानंद खेडेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिता कुडाळकर, दीपक निळेकर, तुकाराम गुरव, सखाराम गुरव, संदीप सावंत, रमेश कुडाळकर, विठोबा कुडाळकर, संतोष कुडाळकर, मंगेश कुडाळकर, प्रकाश कुडाळकर, अनंत पेडकलकर, संजय पेडकलकर, सूर्यकांत खेडेकर, अशोक निळेकर, अनंत खेडेकर, प्रकाश राऊत, नारायण कोरलेकर, सुशांत सांगवेकर, सुरेखा खेडेकर, रोहिणी खेडेकर, वैशाली पेडकलकर, सविता गुरव, चैत्राली गुरव, निकिता कोरलेकर, माधवी पेंडकलकर, शुभांगी कुडाळकर, दिव्या गुरव, अंजनी खेडेकर, वनिता कुडाळकर, शैलेंद्र गायकवाड, शांताराम खेडेकर, संदीप समजिसकर, प्रतिक्षा समजिसकर, रवींद्र कोरलेकर, रेखा पोरलेकर, कृष्णा सावेकर, योगिता सावेकर, वनिता सावेकर, नम्रता खेडेकर, भूपेंद्र लिंगायत व असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.


वैभववाडी भाजपा कार्यालय समोरील पटांगणावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांची सभा पार पडली. याप्रसंगी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, शारदा काबळे, प्राची तावडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा चेहरामोहरा बदलणार; रिक्त पदे तातडीने भरण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश!

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय

कुणकेश्वरच्या विकासासाठी कटीबद्ध ; अधिकाधिक निधी देणार -पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद मिळाल्याची भावना मुंबई : आज महाशिवरात्री निमित्त

आंगणेवाडीचा भक्तीमय सोहळा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग: 'कमलपदी तव नमितो माते जयजय भराडी देवी...... जय जय भराडी देवी......!' असा ध्वनीक्षेपकावर चालु असलेला देवीचा

श्री भराडी देवीची व तिच्या यात्रेची महती जगभरात

सिंधुदुर्ग: आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा महिमा भारतासह जगभरात पसरला आहे. कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या या

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी प्रशासन झाले सज्ज, जादा १३५ बसेसचे नियोजन

कणकवली : कोकणची काशी म्हणून ओळखली जाणारी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या

“महायुतीच्या एकजुटीपुढे कुणाचीही डाळ शिजणार नाही, सिंधुदुर्गात महायुतीच्या १०० टक्के विजयाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार

कुडाळच्या विराट सभेत तळ कोकणावर महायुतीचा भगवा फडकवण्याचे आवाहन कुडाळ : कोकणात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी