श्री भराडी देवीची व तिच्या यात्रेची महती जगभरात


सिंधुदुर्ग: आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा महिमा भारतासह जगभरात पसरला आहे. कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या या आंगणेवाडीत येऊन भराडी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्याचा योग लाभला. एरवी बातम्यामध्ये या जत्रेची महती पाहत होतो, वाचत होतो. पण आता प्रत्यक्ष येथे येण्याचा योग आला. लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित राहणाऱ्या आंगणेवाडी यात्रेचे उत्कृष्ट नियोजन आंगणे मंडळाने केले आहे असे प्रतिपादन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले.


अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी मंगळवारी सायंकाळी आंगणेवाडी यात्रेला भेट देऊन श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि आंगणे कुटुंबियांतर्फे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, उपाध्यक्ष आनंद आंगणे, वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान अक्कलकोट सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी, हडपिड मठ अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर,खजिनदार ज्ञानेश्वर राऊत, बाबू आंगणे, स्वामीभक्त व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, रघुनाथ आंगणे, दाजी सावजी, सचिन लोके, दीपक आंगणे, सौ. नीलम पेडणेकर, श्री पितळे, समीर आंगणे, आबा आंगणे, प्रसाद आंगणे, दिनेश आंगणे, सौ लता पालयेकर, राजेश पारधी तसेच इंगळे यांच्या समवेत प्रथमेश इंगळे, प्रा.शिवशरण अचलेर, डॉ.हिरण्णा पाटील, बाबा सुरवसे, सुरेश वाले सर बाबासाहेब निंबाळकर, विश्वनाथ देवरमनी आदीसह विश्वस्त उपस्थित होते.


यावेळी महेश इंगळे म्हणाले, "आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे स्वयंभू असे स्थान आहे. भराडी देवीची व तिच्या यात्रेची महती जगभरात पसरली आहे. अशा यात्रेला उपस्थित राहून समाधान वाटले. सर्वांच्या सुख शांतीसाठी भराडी चरणी गाऱ्हाणे घातले आहे. श्री स्वामी समर्थ आणि कोकणचे जुने नाते आहे. स्वामी समर्थ यांचे कोकणातही वास्तव्य होते. अशा पावन भूमीत येण्याचा योग आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वामी समर्थांच्या विविध मठांना आपण भेटी देत आहोत. कोकणातून दरवर्षी बहुसंख्य स्वामी भक्त अक्कलकोट येथे भेट देऊन स्वामींचे दर्शन घेतात. श्री भराडी देवी व श्री स्वामी समर्थ यांचा कृपाशिर्वाद सर्वांवर कायम रहावा" असेही महेश इंगळे म्हणाले.


आंगणेवाडीच्या पुण्यभूमीत मंगळवारी अक्कलकोटच्या पावन भूमीतील स्वामी दुतांचे आगमन झाले आहे. आई भराडी देवीप्रमाणे स्वामी समर्थांचे आशीर्वाद सर्व भक्तांच्या पाठीशी राहोत असे यावेळी बोलताना बाबू आंगणे म्हणाले, यावेळी हडपिड मठाच्या वतीने सन्मानचिन्ह आणि स्वामी कृपावस्त्र अध्यक्ष छोटू आंगणे यांना प्रदान करण्यात आले. तसेच वटवृक्ष देवस्थानच्या वतीने आंगणे कुटुंबियांना स्वामी समर्थ फोटो आणि कृपावस्त्र आणि कृपा प्रसाद भेट देण्यात आला. यावेळी भाजप उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी महेश मालक इंगळे यांचे आशीर्वाद घेत ते सलग सहा टर्म नगरसेवक झाल्याबद्दल सत्कार केला.

Comments
Add Comment

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर