आंगणेवाडीचा भक्तीमय सोहळा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग: 'कमलपदी तव नमितो माते जयजय भराडी देवी...... जय जय भराडी देवी......!' असा ध्वनीक्षेपकावर चालु असलेला देवीचा गजर, आणि महाप्रसादाचा सोहळा पाहण्यासाठी देवालयाच्या प्रांगणाबाहेर उसळलेली भक्तांची गर्दी असाच नजारा सोमवारी रात्री आंगणेवाडीत पहावयास मिळाला. महाप्रसाद ताटे लावण्याच्या कार्यक्रमासाठी ९.५० वाजता बंद झालेली दर्शन रांग पुन्हा रात्री १ नंतर चालू झाली. सकाळच्या सत्रा बरोबरच सायंकाळी भाविकानी उच्चांकी गर्दी अनुभवली. मंगळवारी सुद्धा भाविकांच्या गर्दीने आंगणेवाडी यात्रा परिसर फुलुन गेला होता. प्रती पंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवाची सांगता मंगळवारी सायंकाळी उशिरा उत्साहात झाली. दरम्यान भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कुटुंबिया समवेत रात्री भराडी मातेचे दर्शन घेतले. यावेळी कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बंड्या सावंत आदी उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, प्रांत ऐश्वर्या काळुशे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ मोहन दहिकर यांनी मंगळवारी आई भराडीचे दर्शन घेतले.


दोन दिवसात आंगणेवाडीत सुमारे आठ लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातील दर्शन रांगांमधील भाविकांचा ओघ मंगळवारी सायंकाळनंतर चालूच होता. मंगळवारी आंगणे ग्रामस्थानी देवीचे दर्शन घेऊन ओट्या भरल्या. आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी देवीच्या भक्तांसाठी मंगळवारी सुद्धा सायंकाळपर्यंत नवस बोलणे, फेडणे व ओटी भरणे आदी विधी देवीच्या आशीर्वादाने चालू ठेवले होते.

महाप्रसादाच्या सोहळ्याने मंदिर प्रांगण बहरले


यात्रोत्सवातील महत्वाचा असा महाप्रसादाची ताटे लावण्याचा कार्यक्रम शनिवारी रात्री ९.५० वा. सुरु झाला. प्रथम मानकऱ्यांची प्रसादाची ताटे देवीच्या प्रांगणात सवाष्ण महिलांकडून डोक्यावरुन आणण्यात आली. यानंतर सर्व ग्रामस्थांच्या घरात बनवलेली महाप्रसादाची ताटे लावण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी देवीच्या प्रांगणात भक्तानी गर्दी केली होती. ताटे लावणे कार्यक्रम दरम्यान आंगणेवाडीतील सवाष्ण महिलांचा मेळाच देवालयाच्या मागील प्रांगणात भरला होता.



सोमवारी उत्तर रात्री गर्दीचा ओघ वाढला


सायंकाळनंतर भाविकांची गर्दी उत्तरोत्तर वाढत गेली. रात्री बारानंतर तर देवालयाच्या बाहेरील परिसरात रस्त्यावरुन चालणे अवघड बनले होते. यात्रेच्या दोन दिवसात लाखो रुपयांची उलाढाल झाली. मनोरंजनाच्या खेळण्यांच्या भागात बच्चे कंपनीची गर्दी झाली होती. यात्रोत्सवात सेवा दिलेल्या शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांचे यावेळी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडी यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. मोड जत्रेत शेतीची अवजारे व गृहपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बचतगटांच्या स्टॉलना चांगला प्रतिसाद मिळाला. गेले दोन दिवस दुरवरुन आलेल्या भक्तगणांमुळे आंगणेवाडी परिसर फुलुन गेला होता.



भाविकांना मिळाले विनाविलंब दर्शन


एकूण नऊ रांगांद्वारे दर्शन व्यवस्था आंगणे कुटुंबियांच्या वतीने केल्याने तसेच योग्य नियोजनामुळे भाविकांना काही वेळातच देवीचे दर्शन मिळत होते. कुठलीही दर्शन रांग खोळंबलेली दिसून येत नव्हती. ठिकठिकाणी लावलेल्या ४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्वागत कक्षामधून बाबु आंगणे, बाळा आंगणे यांच्याकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत होत्या. सदर व्यवस्था आंगणे कुटुंबीय व रोहन व्हिडीओ कॉम्प्युटेक मुंबईचे अनंत आंगणे यांच्या वतीने करण्यात आली होती. सायंकाळनंतर आकर्षक विद्युत रोषणाईने सर्व परिसर उजळून निघाला होता.



आंगणेवाडीत आज स्वच्छता अभियान


यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. कोणत्याही प्रकारची रोगराई पसरु नये यासाठी परिसरातील शाळा व कॉलेजच्या मुलांकडून तसेच नगरपरिषद सफाई कर्मचारी यांच्याकडून आज आंगणेवाडी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. इच्छुक शाळांना मंडळाचे कार्याध्यक्ष बाळा आंगणे यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या वतीने सुद्धा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. एसटीच्या वतीने मसुरे, कणकवली, मालवण आदी. आंगणेवाडीतील हंगामी स्टँडवरून प्रवाशांना सेवा देण्यात आली.



आंगणे कुटुंबीयांनी मानले आभार


आंगणेवाडी कुटुंबियांच्या वतीने मुंबई मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यानी यात्रोत्सव यशस्वितेबद्दल पोलीस प्रशासन, वीज वितरण, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग तसेच देवी भराडीच्या भक्तांचे आभार मानले. पंढरपूर येथील रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडली.


यात्रोत्सव यशस्वीतेसाठी अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, उपाध्यक्ष आनंद आंगणे, बाळा आंगणे, मधुकर आंगणे, बाबू आंगणे, सतीश आंगणे, दत्ता आंगणे, अनंत आंगणे, दिनेश आंगणे, नंदू आंगणे, सुनील आंगणे, सुधा आंगणे, प्रसाद आंगणे, महेश आंगणे, प्रसाद आंगणे, समीर आंगणे, बाब्या आंगणे, रघुनाथ आंगणे, पंकज आंगणे, आबा आंगणे, प्रसाद मंगेश आंगणे, संकेत आंगणे, जयेश आंगणे, आबा आंगणे, विजय चव्हाण, बंडू चव्हाण, तनुराज आंगणे, कुणाल आंगणे, देवेंद्र आंगणे, जितेंद्र आंगणे, जयेश आंगणे, दया आंगणे, सचिन आंगणे, महेश आंगणे, श्री राणे आदींनी परिश्रम घेतले.

Comments
Add Comment

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना

Types of Earrings : नक्की ट्राय करा 'या' आउटफिटसोबत 'हे' इयररिंग्स

मुंबई : एखादा सुंदर ड्रेस किंवा आकर्षक साडी परिधान केल्यानंतरही लूक पूर्ण वाटत नाही, यामागचे एक महत्त्वाचे कारण

Cooper Hospital : कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह, BMC ने दिली मोठी अपडेट

‘मुंबई Mumbai :  कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह’ या विषयाच्या अनुषंगाने विविध प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या