रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई


अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी रंगतदार लढाई होत असून, २०१७ साली झालेली निवडणूक लढवून विजयी झालेले १४ सदस्य यंदा पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मागच्यावेळी पती निवडून आलेल्या तीन जागांवर पत्नी निवडणूक लढत असून, पत्नी निवडून आलेल्या सहा जागांवर यंदा पती निवडणूक लढवत आहेत.


रायगड जिल्हा परिषदेच्या २०१७ साली विजयी झालेल्या सात सदस्यांनी यंदा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे उर्वरित माजी सदस्यांना मतदार पुन्हा संधी देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मतदान व मतमोजणी तारीख बदलेली असून, मतदान व मतमोजणी दोन दिवस पुढे गेली आहे. ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे दोन दिवस उमेदवारांना प्रचारासाठी अधिकचे मिळाले आहेत. जिल्ह्यात सोयीनुसार युती, आघाडी करण्यात आलेली असून, रायगड जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याने जिल्हा परिषदेवर कोण आपले वर्चस्व प्रस्तापित करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


रायगड जिल्हा परिषद २०१७ च्या निवडणुकीत शेकापचे २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस १२, भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी ३ असे ५९ सदस्य निवडून गेले होते. मात्र नऊ वर्षांत राजकीय परिस्थिती बदललेली आहे. ‘शेकाप’चे आलेले २३ सदस्य हे सध्या इतर पक्षात गेल्याने शेकापला नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागली आहे. या नवतरुण उमेदवारांना मतदार स्वीकारतात का हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मागच्यावेळी निवडून आलेले सुधाकर घारे, मोतीराम ठोंबरे, नरेश पाटील, रवींद्र देशमुख, सुरेश खैरे, आस्वाद पाटील, बबन मनवे हे यंदाच्या निवडणुकीपासून लांब राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत मागच्यावेळी निवडून आलेले १४ जण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत. त्यामुळे मतदार त्यांना पुन्हा संधी देणार का, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.


मागील निवडणुकीतील पक्षीय बलाबल


शेकाप - २३


शिवसेना – १८


राष्ट्रवादी काँग्रेस – १२


भाजप - ३


काँग्रेस - ३


माजी सदस्य पुन्हा आजमावणार नशीब
नारायण डामसे, नीलिमा पाटील, प्रभाकर म्हात्रे, रिना घरत, सुश्रूता पाटील, चित्रा पाटील, दिलीप भोईर, मानसी दळवी, सुरेंद्र म्हात्रे, राजश्री मिसाळ, किशोर जैन, गीता जाधव, स्वाती नवगणे, चंद्रकांत कळंबे हे पुन्हा नशीब आजमावत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

माथेरान पर्यटन स्थळावरील मूलभूत सुविधांचा बोजवारा

सुविधांची पूर्तता करण्यात प्रशासन हतबल माथेरान : पर्यटन नगरी माथेरान हे पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध असले तरी

उन्हाच्या तडाख्यात डोंगरदऱ्यातील रानमेव्याचा गारवा

करवंदे, कैरी, काजू, बोरांना वाढती मागणी खोपोली  : उन्हाळ्याचे आगमन होताच जंगलात तयार होणारा विविध प्रकारचा

तळोजा-खांदेश्वर मेट्रोला मंजुरी

५ हजार ५७५ कोटींची तरतूद तळोजा  : गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबईतील दुसऱ्या मेट्रो