किया इंडियाने जानेवारी २०२६ मध्ये विकल्या २७ हजार ६०३ कार

मुंबई : किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सकारात्‍मकतेसह कॅलेंडर वर्ष २०२६ ची सुरूवात केली, जेथे जानेवारीमध्‍ये एकूण २७,६०३ युनिट्सची विक्री केली. जानेवारी २०२५ मध्‍ये विक्री करण्‍यात आलेल्‍या २५,०२५ युनिट्सच्‍या तुलनेत वार्षिक १०.३ टक्‍के वाढीची नोंद करत या कामगिरीमधून कंपनीची स्थिर वाढ, प्रमुख विभागांमध्‍ये स्थिर मागणी आणि भारतातील ग्राहकांमध्‍ये कियाच्‍या वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन ऑफरिंग्‍जसाठी वाढती पसंती दिसून येते.


जानेवारीमध्‍ये कंपनीच्‍या विक्री गतीचे श्रेय पोर्टफोलिओमध्‍ये सतत मागणीला जाते. ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसला बाजारपेठेतून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे, किया सोनेटची कामगिरी कायम राहिली आहे आणि ग्राहकांकडून किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस व क्‍लॅव्हिस ईव्‍हीसाठी सतत पसंती मिळत आहे. न्‍यू-जनरेशन सेल्‍टोस भारतातील सर्वात प्रभावी व मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही म्‍हणून आपला वारसा अधिक दृढ करत आहे, तसेच किया इंडियाच्‍या विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावण्‍यास सज्‍ज आहे. सोनेटने उच्‍च आकारमानाच्‍या कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागामध्‍ये ब्रँडची प्रबळ उपस्थिती दर्शवणे सुरूच ठेवले आहे. तसेच, कॅरेन्‍स लाइन-अपने रिक्रिएशन वेईकल व ईव्‍ही क्षेत्रातील कियाची उपस्थिती अधिक प्रबळ केली आहे, ज्‍यामधून वैविध्‍यपूर्ण व भविष्‍यासाठी सुसज्‍ज गतीशीलता सोल्‍यूशन्‍ससाठी ग्राहकांची वाढती पसंती निदर्शनास येते.


या मासिक कामगिरीबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष श्री. अतुल सूद म्‍हणाले, ''वर्ष २०२६ मधील प्रेरणादायी शुभारंभामधून ग्राहकांचा किया ब्रँडवर सतत असलेला विश्वास दिसून येतो. न्‍यू-जनरेशन सेल्‍टोससाठी सकारात्‍मक प्रतिसाद, सोनेटसाठी स्थिर मागणी आणि कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस व कॅरेन्‍स ईव्‍हीसाठी वाढती लोकप्रियता यामधून आमच्‍या पोर्टफोलिओची क्षमता व संतुलन निदर्शनास येते. या कामगिरीमधून विभागांमध्‍ये वैविध्‍यपूर्ण, भविष्‍यासाठी सुसज्‍ज उत्‍पादने प्रदान करण्‍यावरील, तसेच सतत एकूण मालकीहक्‍क अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍यावर आम्ही आमचे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.''


कियाचा पोर्टफोलिओ वैविध्‍यपूर्ण होत आहे, जेथे डिझाइन, तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. न्‍यू-जनेरशन सेल्‍टोस व सोनेट त्‍यांच्‍या विभागांमध्‍ये प्रगत कनेक्टिव्‍हीटी व ड्रायव्‍हरला साह्य करणारी वैशिष्‍ट्ये देतात, तर कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस स्थिर ६-सीटर व ७-सीटर कॉन्फिग्‍युरेशन व तिसऱ्या रांगेमध्‍ये केबिनसह वरचढ ठरते. तसेच कियाची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल क्‍लॅव्हिस ईव्‍ही व्‍यावहारिक सात-आसनी ईव्‍ही आहे. या ईव्‍हीमध्‍ये कनेक्‍टेड तंत्रज्ञान असण्‍यासह आरामदायीपणा, सुरक्षितता व दैनंदिन उपयुक्‍ततेवर अधिक लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे.


सुव्‍यवस्थित उत्‍पादन पोर्टफोलिओसह किया इंडिया आगामी महिन्‍यांमध्‍ये ही गती कायम ठेवण्‍यास उत्तमरित्‍या सुसज्‍ज आहे. कंपनी ग्राहकांच्‍या बदलत्‍या अपेक्षांची पूर्तता करत एकूण ब्रँड अनुभव उत्‍साहित करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, जेथे ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाच्‍या पाठबळासह वेळेवर उत्‍पादनामध्‍ये सुधारणा करत आहे.


कियाचे ३७६ शहरांमधील ८४१ टचपॉइण्‍ट्सचे वाढते नेटवर्क किया ब्रँडला देशभरातील ग्राहकांच्‍या जवळ नेत आहे, तसेच महानगर व उदयोन्‍मुख बाजारपेठांमध्‍ये सेल्‍स, सर्विस व मालकीहक्‍क साह्य सहजपणे उपलब्‍ध होण्‍याची खात्री घेत आहे. या सुविधेला १२२ सर्टिफाईड प्री-ओन्‍ड आऊटलेट्सचा पाठिंबा आहे, जे ग्राहकांसाठी सुलभ एक्‍स्‍चेंजेस्, त्‍वरित पेमेंट्स आणि त्रासमुक्‍त मालकीहक्‍क हस्‍तांतरणाची खात्री घेतात.

Comments
Add Comment

Gold Silver Price Hike : सोन्या-चांदीच्या भावात तुफान तेजी! आजच खरेदी करणार असाल तर थांबा; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकन डॉलर आणि बॉंड यील्डमध्ये

Sugar Price Hike : साखर उत्पादनात मोठी घट; दरवाढीने ग्राहकांना फटका, सरकारने सांगितली ‘ही’ कारणे

नवी दिल्ली : चालू साखर हंगामात देशातील साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.

Gold Silver Rate Today : बाईई...सोन्या-चांदीचा भडका! २४ तासांत दर उच्चांकी पातळीवर; पाहा आजचे ताजे भाव!

जळगाव : जळगावच्या (Jalgoan) स्थानिक सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत

PM Awas Yojana 2.0 : ₹२५ लाखांपर्यंत होमलोन, व्याजावर ४% सवलत; घर घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी योजना

नवी दिल्ली : स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची योजना राबवली जात आहे.

Tata Sons AGM adjourned due to lack of quorum : टाटा सन्सची बैठक अचानक रद्द; उद्योगविश्वात चर्चेला उधाण

मुंबई : भारतातील उद्योग जगतातील सर्वात मोठी उद्योग समूह असलेला टाटा सन्सबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. टाटा

Gold-Silver Price 18 August 2026 : आनंदवार्ता! सोने - चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन भाव

मुंबई : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजची महत्त्वाची बातमी आहे. मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजी सोन्या-चांदीच्या दरात