राष्ट्रवादीत घडामोडींना वेग; शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द, पुण्याला रवाना

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला दिल्ली दौरा अचानक रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्याचे नियोजन असतानाच त्यांनी हा निर्णय घेतला असून, ते मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले आहेत.


शरद पवार सोमवारी रात्री मुंबईत होते. दिल्ली दौरा रद्द केल्यानंतर त्यांचा आजचा मुक्काम पुण्यात राहणार असून, त्यानंतर ते बारामतीला जाण्याची शक्यता आहे. बारामतीत पुढील दोन ते तीन दिवस त्यांचा मुक्काम असण्याची माहिती आहे. दिल्ली दौरा अचानक का रद्द करण्यात आला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत चर्चा सुरू असताना हा दौरा रद्द झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


दरम्यान, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतण्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ आणखी दोन वर्षे शिल्लक होता, त्यांची मुदत ४ जुलै २०२८ रोजी संपणार होती. मात्र, ही जागा राखून ठेवण्याऐवजी सहा वर्षांची पूर्ण मुदत असलेल्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना पाठवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही जागा लवकरच भरली जाण्याची शक्यता असून, त्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती आहे.


अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही राजकारणात अधिक सक्रिय होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. यापूर्वी बारामतीतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे. एकीकडे सुनेत्रा पवार राज्याrashtrawadi त उपमुख्यमंत्री म्हणून सूत्रे सांभाळतील, तर पार्थ पवार दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या संदर्भात पक्षाच्या बैठकीत पार्थ पवार यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. पार्थ यांनी यापूर्वी २०१९ मध्ये मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून