मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ३ फेब्रुवारी २०२६ रोजी विमानांचा मोठा अपघात टळला आहे.


हाती आलेल्या प्राथमिक वृत्तानुसार, एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या प्रत्येकी एका प्रवासी विमानाचे पंख एकमेकांना धडकले. जेव्हा हा अपघात झाला त्यावेळी दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते.


कोइम्बतूरला जाण्यासाठी मागे सरकणारे एअर इंडियाचे विमान एआय २७३२ आणि हैदराबादहून आगमन झाल्यानंतर विमानतळाच्या टॅक्सी वे वरून पुढे सरकत असलेले इंडिगोचे विमान ६ई ७९१ यांच्यात टक्कर झाली. दोन्ही प्रवासी विमानांचे पंख एकमेकांना धडकले. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन्ही कंपन्यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


एअर इंडियाचे विमान उड्डाणासाठी प्रतीक्षेत होते आणि टॅक्सी वे वर पुढे सरकण्यासाठी वाट बघत होते त्याचवेळी दुसऱ्या कंपनीच्या विमानाच्या संपर्कात आले. दोन्ही विमानांच्या पंखांच्या टोकांचा संपर्क झाला, ज्यामुळे आमच्या विमानाच्या पंखांच्या टोकाचे नुकसान झाले, अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, एअर इंडियाचे विमान पुढील तांत्रिक तपासणीसाठी रिकामे केले आहे आणि थांबवले आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे आणि तंत्रज्ञ विमानाची तपासणी करत आहेत. प्रवासी सुरक्षित असून पर्यायी विमानाने लवकरच पुढील प्रवास सुरू करतील, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले.


विमानतळावरील घटनेची माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाला अर्थात डीजीसीएला देण्यात आली आहे. प्रवाशांच्या गैरसोयीसाठी एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असेही एअर इंडियाने सांगितले.


इंडिगोचे विमान विमानतळावर पार्क केले असून सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या उतरवण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इंडिगोच्या विमानाची तंत्रज्ञांद्वारे तपासणी सुरू आहे. इंडिगोनेही प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या

Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमा निश्चित करा!

 महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, तीन महिन्यात अहवाल सादर

Chandrashekhar Bawankule : अवैध मुरुम उत्खनन दोषी अधिकाऱ्यांचीनंतरच बडतर्फी

 सोलापूरमधील चिंचोली एमआयडीसीमधील प्रकार  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश  २०० कोटींच्या दंड

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :