मुंबई: मुंबई रात्रीच्या अंधारात विसावलेली असतानाच मेट्रो मार्गिका ४ ने एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार केला. भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रिक टन वजनाचे ३ भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या लॉन्च करण्यात आले.
एमएमआरडीएचा उत्कृष्ट समन्वय
तब्बल ८ हेवी ड्युटी क्रेन्स आणि १२ मल्टी-अॅक्सल वाहनांच्या सहाय्याने हे स्टील स्पॅन्स अत्यंत अचूकपणे आणि कौशल्याने बसवण्यात आले. या कामासाठी महानगरपालिका (BMC), बेस्ट, भांडुप वाहतूक पोलीस, भांडुप पोलीस तसेच परिसरातील रहिवासी व दुकानदार यांच्यासोबत एमएमआरडीएने उत्कृष्ट समन्वय साधला.
मुंबई रात्रीच्या अंधारात विसावलेली असतानाच मेट्रो मार्गिका ४ ने एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार केला. भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रिक टन वजनाचे ३ भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या लॉन्च करण्यात आले. ८ हेवी ड्युटी क्रेन्स आणि १२ मल्टी-अॅक्सल वाहनांच्या सहाय्याने हे स्टील… pic.twitter.com/WqtncR7GqH
— MMRDA (@MMRDAOfficial) February 1, 2026
केवळ दोन रात्रींमध्ये काम पूर्ण
उत्कृष्ट नियोजन आणि समन्वयामुळे चार रात्री लागणारे हे काम अवघ्या दोन रात्रींमध्ये पूर्ण करण्यात यश आले. या मोहिमेसाठी ३५ अभियंते, १०० हून अधिक कुशल कामगार, ७० वाहतूक वॉर्डन आणि २५ हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात होते. नागरिकांना अत्यल्प त्रास होईल, याची विशेष काळजी घेऊन हे काम पूर्ण करण्यात आले.
या स्टील स्पॅन्सच्या यशस्वी उभारणीमुळे मेट्रो मार्गिका ४ च्या बांधकामातील आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड गाठण्यात आला आहे, ही समाधानाची बाब आहे.






