अखेर भाजपचा गटनेता ठरला, गणेश खणकर यांची नियुक्ती

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपाच्या गटनेते पदी गणेश खणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खणकर हे प्रभाग ३ मधून निवडून आले आहेत. प्रहारने काही दिवसांपूर्वीच या संदर्भातले अचूक अंदाज वर्तवणारे वृत्त दिले होते आणि आता खणकर यांची गटेनेते पदी नियुक्ती पाहायला मिळत आहे.

गटनेते पदी गणेश खणकर यांची निवड


भाजप महापालिका गटनेते पदी गणेश खणकर यांची निवड झाली आहे. खणकर हे प्रभाग ३ मधून निवडून आले असून ते भाजपाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी उबाठाचे सौरभ घोसाळकर यांचा पराभव केला आहे.



 

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नवनिर्वाचित गटनेते गणेश खणकर यांचे अभिनंदन केले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे ८९ नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेतील भाजप हा मोठा पक्ष असल्याने या पक्षाच्या महापौर बनल्यास याच पक्षाचा गटनेता हा सभागृह नेता म्हणून निवडला जाऊ शकतो. त्यामुळे या सभागृह नेते पदासाठी माजी सभागृह नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, प्रभाकर शिंदे यांनी यापूर्वी सभागृह नेतेपद भूषवलेले असल्याने या पदावर पुन्हा त्यांची नेमणूक केली गेल्यास स्थायी समिती अध्यक्षपद कोणाला द्यावे यावरून पक्षाची मोठी अडचण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या सभागृह नेतेपदी भाजपचे प्रवक्ते आणि भाजपचे महामंत्री गणेश खणकर यांच्या नावाचा विचार केल्याची चर्चा आहे.
Comments
Add Comment

Sara Tendulkar : प्रेक्षकांचे वेधले लक्ष; सारा तेंडुलकरचा स्पेन मधील ग्लॅमरस लुक

भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेत

Maha Rojgar Melava : पनवेलमध्ये ‘महारोजगारमेळावा २०२६’ला हजारोंचाउत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचासहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ

पनवेल : रोजगाराच्या शोधात असलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छिणाऱ्या हजारो युवक-युवतींसाठी पनवेलमध्ये

Nashik News : विशेष महासभेत सहा मृतांच्या कुटुंबीयांना धनादेश वितरित

Nashik News : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत नाशिकचे रस्ते, त्यातील खड्डे आणि त्या खड्ड्यांमुळे झालेले अपघात चर्चेच्या

प्लास्टिकमुळे कॅन्सर; पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटली सुरक्षित आहे का ?

प्लॅस्टिक आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. परंतु संशोधनातून असे समोर आले आहे की

Arjun Ranatunga : श्रीलंकेच्या क्रिकेटरचा नवा लुक चर्चेत; बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय? चला जाणून घेऊया

अर्जुन रणतुंगानी तब्बल ७२ किलो वजन कसे कमी केले ? श्रीलंकेचे माजी क्रिकेट कर्णधार अर्

Jalgaon Airport : जळगाव विमानतळ विस्ताराला वेग ! जमीन मोजणी तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Jalgaon Airport : जळगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. विमानतळ