ऑस्ट्रेलिया: टेनिसच्या जगात इतिहास घडवत तरुण स्पॅनिश स्टार कार्लोस अल्काराझनं वयाच्या २२व्या वर्षी करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या अंतिम फेरीत,अल्काराझनं नोवाक जोकोविचला एका रोमांचक सामन्यात हरवून आपलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद जिंकलं. विशेष म्हणजे जोकोविचने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलं तेव्हा अल्काराझ फक्त चार वर्षांचा होता. ज्याचा गेम बघत तो मोठा झाला त्यालाच आपल्या उत्कृष्ट खेळाने पराभूत करून आपलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद जिंकलं आहे.
२२व्या वर्षी करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण:
कार्लोस अल्काराझनं अंतिम फेरीत सर्बियन नोवाक जोकोविचचा २-६,६-२,६-३,६-४ असा पराभव करुन त्याचं सातवे ग्रँडस्लॅम जेतेपद आणि पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलं. २२व्या वर्षी करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण करणारा कार्लोस अल्काराझ हा इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू बनला.
जोकोविचवर विजय मिळवत कार्लोस अल्काराझचा ऐतिहासिक पराक्रम#carlosalcaraz #prahaarshorts #won #austrilia pic.twitter.com/KpIuQBaAmK
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) February 2, 2026
८८वर्षांचा जुना विक्रम मोडला:
कार्लोस अल्काराझनं यापूर्वी विम्बल्डन (२०२३,२०२४), फ्रेंच ओपन (२०२४,२०२५), यूएस ओपन (२०२२) आणि ऑस्ट्रेलियन ओपन (२०२६) जिंकले होते. या विजयासह अल्काराझनं करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले आहे. कार्लोस अल्काराझ हा करिअर ग्रँड स्लॅम मिळवणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू आहे. अल्काराझनं डॉन बजचा ८८वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे.
जेव्हा एखादा खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतील सर्व चार प्रमुख स्पर्धा जिंकतो तेव्हा त्याला करिअर स्लॅम म्हणतात. या चार प्रमुख स्पर्धा म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन.
ऑस्ट्रेलियन ओपन २०२६चं विजेतेपद जिंकल्यानंतर, कार्लोस अल्काराझला ४.१५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ३८ कोटी ५ लाख रुपये) इतकी मोठी बक्षीस रक्कम मिळाली, तर उपविजेत्या नोवाक जोकोविचला २.१५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (अंदाजे १९ कोटी ७१ लाख रुपये) इतकी बक्षीस रक्कम मिळाली.






