महायुती एक आणि एकच राहणार! महायुतीला गालबोट लावू देणार नाही

जिल्ह्यात पन्नास जागा जिंकण्याचा आ. निलेश राणे यांचा निर्धार


वेंगुर्ले : महायुतीचे सर्व उमेदवार कसे निवडून येतील याबाबत आमची चर्चा होती. जशी आम्ही महायुतीबाबत खबरदारी घेतो तशी भाजपने सुद्धा घ्यायला हवी. याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. जिल्ह्यात पन्नासही जागा महायुती जिंकू शकते अशी परिस्थिती आहे. मात्र, काही उमेदवारांची धाकधूक माझ्या कानावर आली आहे. तुमची कुठे अडचण होईल, असे आम्ही होऊ देणार नाही, याचा बंदोबस्त आम्ही करू. महायुती एक आणि एकच राहणार. जर कुठे गालबोट लागत असेल, तर त्याचा बंदोबस्त करू. आमदार केसरकर ज्येष्ठ आहेत. ते त्यांचे काम करीत आहेत. जी काय गडबड सुरू आहे ती माझ्या कानावर आली आहे आणि त्यावर उपायही मी सांगितले आहेत. त्यामुळे तुम्ही निवडणुकीवर लक्ष ठेवा. निवडून या, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी वेंगुर्ला येथे केले.


वेंगुर्लेत शनिवारी शिंदेसेनेच्या कार्यालयात आमदार निलेश राणे यांनी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार व प्रमुख पदाधिकारी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी बंद खोलीत झालेल्या चर्चेत उमेदवारांनी आपल्याला येत असलेल्या अडचणींबाबत आमदार राणे यांच्याकडे व्यथा मांडली. यानंतर उपस्थित उमेदवार व पदाधिकारी यांना आ. निलेश राणे यांनी संबोधित करीत नवी ऊर्जा दिली. यावेळी शिंदेसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, प्रभारी तालुकाप्रमुख सचिन देसाई, युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, बाळा दळवी, सुनील मोरजकर, काशिनाथ नार्वेकर, शितल साळगांवकर यांच्यासहीत तालुक्यातील शिवसेनेचे उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, आज या निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला चांगले वातावरण आहे. ज्याप्रमाणे वेंगुर्ला तालुक्यातील उमेदवारांना आमदार राणे यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सावंतवाडी व दोडामार्ग याठिकाणी सुद्धा आपला वेळ द्यावा. महायुतीच्या विरोधात तिसऱ्या शक्तीने उभे केलेले अपक्ष उमेदवार हे पडले पाहिजेत यासाठी काम करा असे आवाहन त्यांनी केले.


 
Comments
Add Comment

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी सिंधुरत्न समृद्ध २.० योजना - राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारणार

प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंद्र उभारणार मुंबई : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन

Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा चेहरामोहरा बदलणार; रिक्त पदे तातडीने भरण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश!

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय

कुणकेश्वरच्या विकासासाठी कटीबद्ध ; अधिकाधिक निधी देणार -पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद मिळाल्याची भावना मुंबई : आज महाशिवरात्री निमित्त

आंगणेवाडीचा भक्तीमय सोहळा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग: 'कमलपदी तव नमितो माते जयजय भराडी देवी...... जय जय भराडी देवी......!' असा ध्वनीक्षेपकावर चालु असलेला देवीचा

श्री भराडी देवीची व तिच्या यात्रेची महती जगभरात

सिंधुदुर्ग: आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा महिमा भारतासह जगभरात पसरला आहे. कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या या

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी प्रशासन झाले सज्ज, जादा १३५ बसेसचे नियोजन

कणकवली : कोकणची काशी म्हणून ओळखली जाणारी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या