Rohit Shetty : बॉलिवूड हादरलं! ॲक्शन किंग अन् दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या जुहूतील बंगल्यावर मध्यरात्री गोळीबार; तो आला अन्...थेट

मुंबई : बॉलीवूडचे 'ॲक्शन किंग' म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर शनिवारी रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर दुचाकीवरून आले होते आणि त्यांनी बंगल्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या. सुदैवाने, या भ्याड हल्ल्यात रोहित शेट्टी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जखमी झालेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणाने केला, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.



नेमकं काय घडलं?


दुचाकीवरून आला अन्...


शनिवारी रात्री उशिरा एका अज्ञात तरुणाने हा गोळीबार केला असून, यामध्ये रोहित शेट्टी यांच्या बंगल्याच्या खिडक्यांचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एक तरुण दुचाकीवरून रोहित शेट्टीच्या बंगल्याबाहेर आला. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने 'हुडी' घातली होती. बंगल्याजवळ थांबताच त्याने अचानक बंदूक काढून थेट घराच्या दिशेने ४ गोळ्या झाडल्या. या गोळीबारात खिडकीच्या काचा फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृत्य केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच तो तरुण दुचाकीवरून वेगाने पसार झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



गोळीबाराच्या तपासासाठी पोलिसांची 'स्पेशल टीम' तैनात


रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावरील गोळीबारानंतर जुहू पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने रोहित शेट्टींच्या निवासस्थानाला पोलीस छावणीचे स्वरूप दिले असून, बंगल्याच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी हा संपूर्ण परिसर तात्पुरता सील केला आहे. हल्लेखोर ज्या मार्गावरून आला आणि ज्या मार्गाने पसार झाला, त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पोलीस बारकाईने तपासत आहेत. 'हुडी' घातलेल्या त्या अज्ञात तरुणाचा शोध घेण्यासाठी प्रत्यक्षदर्शींची आणि स्थानिक नागरिकांची चौकशी केली जात आहे. या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पोलीस सध्या 'गँगस्टर अँगल'ने अधिक तपास करत आहेत.



सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल


गोळीबारानंतर रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर असलेल्या पोलिसांच्या ताफ्याचा आणि तणावपूर्ण वातावरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला

Mankhurd News : मानखुर्दमधील १४०० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील अतिक्रमणाचा डाव हाणून पडला महानगरपालिका आणि उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय