प्रमित झवेरी यांचा सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्त पदाचा राजीनामा

मुंबई : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे प्रमित झवेरी यांनी ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’च्या विश्वस्त पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. झवेरी यांचा कार्यकाळ ११ फेब्रुवारी २०२६ रोजी संपत असून, त्यांनी फेरनियुक्तीस नकार दिला आहे.


झवेरी यांनी टाटा ट्रस्ट्सचे विद्यमान अध्यक्ष नोएल टाटा यांना ३१ जानेवारी रोजी औपचारिक पत्र लिहून निर्णयाची माहिती दिली. ‘माझा कार्यकाळ ११ फेब्रुवारी २०२६ रोजी संपत आहे व त्यानंतर मी पुन्हा विश्वस्त म्हणून काम पाहू इच्छित नाही,’ असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात त्यांनी नोएल टाटांशी आधीच चर्चा केली होती. झवेरी हे सिटी बँकेचे माजी प्रमुख आहेत. ते आर्थिक सल्लागार म्हणून ट्रस्टमध्ये कार्यरत आहेत.

Comments
Add Comment

FD New Rule : येत्या १ ऑक्टोबरपासून FD चे नवे नियम लागू! RBI चा मोठा निर्णय; गुंतवणूकदारांनी आधी हे जाणून घ्या

मुंबई : फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय

Gold News : आता लॉकरमध्ये पडलेल्या सोन्यातून मिळणार नफा! वर्षाला ४% अतिरिक्त सोनं मिळवण्याची नवी योजना; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मुंबई : भारतीय कुटुंबांमध्ये सोन्याला गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानले जाते. अनेकजण भविष्यातील गरज

Tax Devolution To Maharashtra : केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख हजार कोटींचे कर वितरण

महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी नवी दिल्ली : राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देत

Gold Silver New Rate : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे नवीन दर

मुंबई : ऑगस्ट महिन्याची सुरुवात सराफा बाजारासाठी तेजीची ठरली आहे. १ ऑगस्ट रोजी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या

Nitin Gadkari : ई-20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होऊ शकते - गडकरी

नवी दिल्ली : ई-20 (इथेनॉल) मिश्रित पेट्रोल वापरल्याने वाहनांचे नुकसान होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक

IndiGo Airlines : पर्यटन मंत्रालयाचा इंडिगोसोबत सामंजस्य करार

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने नवी दिल्ली येथे भारताला जागतिक स्तरावरील पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून