नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याची कामे सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू आहेत. या कामासाठी सातत्याने महामार्गावर टप्प्याटप्प्यात वाहतूक ब्लॉक घेतला जात आहे. त्यानुसार ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान १४ टप्प्यांत वर्धा आणि नागपूर दरम्यानच्या भागातील महामार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी बंद राहणार आहे.


वर्धा येथील साखळी क्रमांक ५८.९ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. वर्धा येथील साखळी क्रमांक ५९.६ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. वर्धा येथील साखळी क्रमांक ६५.४ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३१.५ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३७.७ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३७.७ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ४५.४ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. हिंगणा, नागपूर येथील साखळी क्रमांक ८.६ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक २ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. हिंगणा, नागपूर येथील साखळी क्रमांक ८.६ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक २ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील.

Comments
Add Comment

Maharashtra Delivery Boy Police Verification : यापुढे ‘डिलिव्हरी बॉईज’ची तपासणी बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

कामगार मंत्र्यांचे गृह विभागाला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश मुंबई : ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि

Gautam Birhade : गौतम बिर्‍हाडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नवे संचालक

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) संचालक (प्रकल्प) पदी ज्येष्ठ अभियंता गौतम बिर्‍हाडे (Gautam Birhade)

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून