हिंगोली जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण; ६९ वर्षाच्या वृद्धास अटक

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पोलिसांनी एका ६९ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. संबंधित घटना कळमनुरी तालुक्यात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे पालक संशयिताच्या शेतात मजुरीचे काम करतात. घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास अल्पवयीन मुलगी शाळेसाठी घरातून निघाली होती. त्या वेळी संशयिताने तिला एकटी पाहून चॉकलेटचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी नेले आणि तेथे मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


घटनेनंतर पीडित मुलगी घाबरलेल्या अवस्थेत घरी परतली. तिने आपल्या आईला संपूर्ण प्रकार सांतल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले.


पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, पुढील चौकशीसाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित पोलिसांना कळवावी, जेणेकरून वेळेत कारवाई करता येईल. या प्रकरणाचा तपास कळमनुरी पोलीस करत असून, तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर