बॉलिवूडची 'लेडी सिंघम' अर्थात राणी मुखर्जी पुन्हा एकदा मोठ्या पदडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिचा बहुप्रतिक्षित असा मर्दानी ३ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला.या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा 'शिवानी शिवाजी रॉय' या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. राणी मुखर्जी हिच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. आणि या चित्रपटाला प्रेक्षकवर्गानेही भरभरून प्रतिसाद दिला आहे.
मर्दानी ३ ने पहिल्या दिवशी भारतात सुमारे ४.५६ कोटींच्या जवळपास रुपयांची कमाई केली आहे. राणी मुखर्जीच्या मागील चित्रपट मर्दानी २ याच्या तुलनेत या चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली आहे. मर्दानी २ ने पहिल्या दुवंशी ३.८० कोटींची कामे केली होती, त्या तुलनेत तिसऱ्या भागाला प्रेक्षकांनी अधिक पसंती दर्शवली आहे.
राणी मुखर्जी 'शिवानी शिवाजी रॉय' या डॅशिंग पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत पडद्यावर परतली आहे. 'मर्दानी ३' हा चित्रपट शुक्रवारी, ३० जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. गंभीर विषय आणि राणीच्या जबरदस्त अभिनयामुळं या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर समाधानकारक सुरुवात केली आहे.
मर्दानी ३सिनेमाच्या एकूण कमाई बद्दल बोलायचं झालं तर सिनेमानं भारतभर ४.५६ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. तर Worldwide कलेक्शन हे ५.५० कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातंय. या आकड्यांमध्ये बदल होण्याचीही शक्यता असते.
यावेळी शिवानी शिवाजी रॉय एका अत्यंत गंभीर अशा ९३ मुलींच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास करताना दिसत आहे. अभिराज मिनावाला यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. अतिशय थरारक पद्धतीनं हा गंभीर विषय मांडला आहे. यशराज फिल्म्सनं तिकीट दरांबाबत विशेष रणनीती आखली असून, सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात तिकीटे उपलब्ध करून दिली आहेत.