अपघातात जखमींना मिळणार कॅशलेस उपचार

प्राण वाचवणाऱ्या मदतनीसालाही २५ हजार रुपये रोख बक्षीस

रत्नागिरी : रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या महत्वाच्या वेळेमध्ये उपचारांचा खर्च अडसर ठरू नये, यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना सात दिवसांसाठी दीड लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. इतकेच नव्हे तर अपघातग्रस्ताला तातडीने रुग्णालयात पोहोचवून प्राण वाचवणाऱ्या मदतनीसाला राहवीर म्हणून २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. नवी कॅशलेस योजना, राहवीर योजना लवकरच राष्ट्रीय स्तरावर लागू केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या निर्णयामुळे अपघातग्रस्तांसाठी दिलासादायक चित्र निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रस्ते सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी मोटार वाहन कायद्यात एकूण 61 दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेच्या माध्यमातून रस्ते अपघातांची संख्या तसेच अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या सरकारचा ठोस प्रयत्न आहे. तातडीने उपचार, नागरिकांना मदतीसाठी प्रोत्साहन आणि पीडित कुटुंबाना आर्थिक आधार या त्रिसूत्रीमुळे रस्ते सुरक्षेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली होती आणि तिला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे ही योजना यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता ही योजना राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी  : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात पावसाचे

मंडणगडमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढतीने वाढवली निवडणुकीची उत्कंठा

मंडणगड : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना ६-० असा

मुंबई - गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे खोदकामामुळे परिस्थिती गंभीर

व्यापारी, कर्मचारी व नागरिकांना नियोजनाअभावी बसतोय मोठा फटका संगमेश्वर  : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील

राजापुरात शिवसेना विरुद्ध उबाठा थेट संघर्ष

संतोष मोंडे राजापूर : राजापूर तालुक्यात विकासाची गंगा पोहोचवणारी 'मिनी मंत्रालये' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

चिपळुणात शिवसेना-भाजप युती, राष्ट्रवादी, उबाठा सेनेत तिरंगी लढत

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायती समितीच्या एकूण २७ जागांसाठी मंगळवारी अखेरच्या दिवशी २१ उमेदवारांनी अर्ज मागे

लांजात जि.प.च्या ४ तर पं.स.च्या पाच उमेदवारांनी अर्ज मागे, जि.प. साठी ९ तर पंचायत समितीसाठी २६ उमेदवार रिंगणात

लांजा (संतोष कोत्रे) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २७ जानेवारी रोजी