Pune Crime : पुण्यातील गोल्डनमॅन म्हणुन ओळखला जाणारा सनी नाना वाघचौरे याला बिश्रोई गँगकडुन जिवे मारण्याच धमकी आल्याचे त्यांनी सांगीतले व ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी गोल्डन मॅन सनी नाना वाघचौरे ला धमकी आल्याचे समजले आहे.या प्रकरणानंतर सनी वाघचौरे याने लगेच पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार नोंदवली आहे. मागीतलेली रक्कम न दिल्यास "तुझा बाबा सिद्दीकी करु" अशी माहिती पोलीसांना सनी वाघचौरे यांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटांच्या सुमारास एका आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबरवरून त्यांना व्हॉट्सॲप कॉल आला होता. सुरुवातीला हा कॉल त्यांनी उचलला नाही. त्यानंतर “शुभम लोणकर कॉल मी” असा मेसेज आला. पुन्हा आलेला कॉल उचलल्यानंतर, समोरून “मी बिश्नोई गँगमधून शुभम लोणकर बोलतोय. गुगलवर सर्च करून बघ,” असे सांगत फोन कट करण्यात आला.
यानंतर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून वारंवार व्हॉट्सॲप कॉल येऊ लागले. सुरुवातीला मस्करी समजून वाघचौरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून २१ मिनिटांनी थेट धमकीचा मेसेज आल्याने ते हादरून गेले. पाच दिवसांत पाच कोटी रुपये न दिल्यास बाबा सिद्दिकीप्रमाणे हत्या करण्याचा इशारा देण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
सनी वाघचौरे हे सामाजिक आणि विविध प्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये २ ते ३ किलो सोन्याचे दागिने परिधान करून उपस्थित राहत असल्याने ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळखले जातात. ६ जानेवारी रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून, सोशल मीडियावर त्यांचे तब्बल २५ मिलियन फॉलोअर्स आहेत. या प्रकरणाचा तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सुरू असून, धमकी देणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.