मोहित सोमण: आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांचे अर्थसंकल्प सर्वेक्षण २०२५-२०२६ वर लक्ष केंद्रित असेल. भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा व दशा यातून स्पष्ट होणार असून परवाच्या वित्तीय आयोगाच्या शिफारशी राष्ट्रपतींकडे सादर झाल्यानंतर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पीय सर्वेक्षण सादर करतील. लोकसभा व राज्यसभेच्या संसदीय अधिवेशनात हे सर्वेक्षण सादर केले जाणार आहे. याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा हा अर्थसंकल्प 'ऐतिहासिक' असे वर्णन करून गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढवली असल्याचे स्पष्ट झाले. काल २८ जानेवारीपासूनच अर्थसंकल्प अधिवेशनाची सुरुवात झाली असून आज अर्थसंकल्पाचा रोडमॅप संसदेत निर्मला सीतारामन सर्वेक्षण (Ecnomic Survey 2025-2026) अंतर्गत मांडणार आहेत. यापूर्वी अरविंद पंगारिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर्षीच्या शिफारशीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तो अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात आला होता. आता २ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असून तत्पूर्वी आज सर्वेक्षण सादर केले जाईल.
विशेषतः गुंतवणूकदारांचे लक्ष अर्थसंकल्पावर केंद्रित असताना अर्थसंकल्पातील कराविषयी नवी अपडेट, आयात निर्यातीवरील सुधारणा, एफटीएतील नव्या तरतुदी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पुरवठा साखळी (Supply Chain), इन्फ्रास्ट्रक्चर, फिनटेक, शेती अशा क्षेत्रांमध्ये लागलेले असून यातील नव्या अपडेट बाजारासाठी बूस्टर ठरू शकतात. उपलब्ध माहितीनुसार, भारतामध्ये क्रीडा साहित्याच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहनपर योजनांवर विचार करत आहे आणि आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे असे सूत्रांनी प्रसारमाध्यमांना नुकतेच सांगितले आहे.
या चर्चेची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांच्या मते, प्रस्तावित योजना १ एप्रिल २०२६ पासून लागू होऊ शकते आणि ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी चालेल. तर दुसरीकडे या वर्षी सादर होणारा अर्थसंकल्प हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सलग नववा केंद्रीय अर्थसंकल्प असेल जो कोणत्याही अर्थमंत्र्याने सादर केलेल्या अर्थसंकल्पांमध्ये सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक वेळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या अंतर्गत सादर होणारा हा तिसरा संपूर्ण अर्थसंकल्प देखील असणार आहे. उत्पादन क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात यंदा प्रोत्साहन सरकारकडून मिळू शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे. रविवारी १ फेब्रुवारीला संसदेत बजेट (अर्थसंकल्प) विषयी भाषण निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता करतील अशी माहिती समोर आली आहे. या अर्थसंकल्पीय तरतूदीची अंमलबजावणी २ टप्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी, दुसऱ्या टप्प्यात ९ मार्च ते २ एप्रिल पर्यंत होणार असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.
नुकताच भारत व युरोपियन युनियन यांच्यातील द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नुकत्याच झालेल्या भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे भारतीय निर्यातदारांना स्वस्त दरात वस्तू विकण्यासाठी एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.या तिमाहीच्या अगदी सुरुवातीला झालेला भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हे दर्शवतो की येणारी दिशा किती उज्ज्वल आहे आणि भारताच्या तरुणांचे भविष्य किती आशादायक आहे, असे ते राष्ट्राला संबोधित करताना म्हणाले होते. आता संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर होण्यापूर्वी राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर जोर दिला की भारत 'सुधारणेच्या एक्सप्रेस' मोडवर असल्याचे म्हटले. तंत्रज्ञानाच्या शर्यतीत पुढे जात असतानाही, दृष्टिकोन मानवकेंद्रितच राहील असे पीएम मोदी म्हणाले होते.