BMC News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांमध्येच धुसफुस; व्हॉट्सअप ग्रुपवरुन बाहेर पडल्याने नाराजी उघड

- महापालिका आयुक्तांना आता याप्रकरणात लक्ष घालण्याची वेळ


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी स्वच्छता आणि पदपथ अतिक्रमण मुक्तीची मोहिम हाती घेतली असतानाच आता सहायक आयुक्तांमध्ये वेगळ्याच मुद्दयावरून धुसफुस असल्याचे ऐकायला मिळत आहे. आजी व माजी सहायक आयुक्त आणि उपायुक्तांसह सहआयुक्तांच्या वॉट्सअप ग्रुपवरुन हे सर्व नगरसेवक एक्झिट झाल्याने ही नाराजी समोर आली आहे. मात्र, ही धुसफुस बदलीच्या मुद्दयावरून असल्याचे बोलले जात असले तरी नवीन बॅचमधील सहायक आयुक्तांना बदनाम केले जात असल्याच्या कारणामुळे ही धुसफूस वाढत चालल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आता महापालिका आयुक्त आश्विनी भिडे जुन्या आणि नवीन सहायक आयुक्तांची मोट अशाप्रकारे बांधून त्यांच्याकडून कामे करून घेतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. (BMC News)


मुंबई महापालिकेतील नवीन बॅचमधील काही सहायक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश मागील आठ दिवसांपूर्वी जारी करण्यात आले आहे. या बदली आदेशानंतर महापालिका सहायक आयुक्त हे याचा निषेध करत सर्व अधिकाऱ्यांसाठी असलेल्या एका वॉट्सअप ग्रुपवरून चक्की बाहेर पडले. मुंबई महापालिकेत निवृत्त सहअायुक्त, उपायुक्त तसेच सहायक आयुक्त यांच्या विद्यमान सहआयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्तांचा एक प्रशासनातील अधिकाऱ्यांचा एक वॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपवरुन नवीन बॅचचे सर्व सहायक आयुक्त एकत्रपणे बाहेर पडले आणि त्यामुळे महापालिकेतील सहायक आयुक्तांमधील गटबाजी आणि धुसफुस उघड होत आहे. (BMC News)



मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर आश्विनी भिडे हे विराजमान झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या स्वच्छतेवर भर देतानाच पदपथांची सुधारणा आणि आता पदपथ अतिक्रमण मुक्त करण्याची मोहिम हाती घेतली आहे. आश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना एकप्रकारे नवीन आणि जुन्या सहायक आयुक्तांना कामे करण्यासाठी नवीन ऊर्जा प्राप्त होते, शिवाय एक वेगळाच कामाचा अनुभव आणि आपल्या प्रभागात चांगल्याप्रकारचे काम केल्याचे समाधानही मिळू शकते. आश्विनी भिडे यांच्यासारखे डॅशिंग आणि मुंबईसाठी काही वेगळी छाप पाडण्यासाठी नियोजनबध्द काम करणारे व्यक्तिमत्व असल्याने तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करणारे प्रशासनाचे प्रमुख अधिकारी असताना अशाप्रकारे नवीन सहायक आयुक्तांमध्ये नाराजी असणे हे ,हे एकप्रकारे आयुक्तांच्या स्वप्नातील मुंबईच्या विकासकामात अडथळा आणण्यासारखा प्रयत्न आहे. (BMC News)



या सर्व नवीन बॅचमधील सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्याने तसेच अतिरिक्त पदभार सोपवण्यात न आल्याने ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही धुसफूस असली तरी प्रत्यक्षात नवीन बॅचमधील सहायक आयुक्तांना बदनाम केले जात आहे, त्यांना महत्वाची पदे मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत अशाप्रकारे वृत्त पसरवून बदनामी केली असल्याने याचा निषेध म्हणून नवीन बॅचमधील सहाक आयुक्त वॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आयुक्तांनी मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी स्वच्छता आणि पदपथ अतिक्रमण मुक्त करण्याची माेहिम हाती घेतलेली असतानाच अशाप्रकारची नाराजी ही कुठेतरी या मोहिमेला अडथळा आणणारी ठरणारी आहे. एका बाजुला आधीच मेंटनन्स विभागाचे सहायक अभियंता, अतिक्रमण विभागाचे तसेच परवाना विभागाचे अधिकारी यांच्याकडून सहायक आयुक्तांना योग्य ते सहकार्य मिळत नाही अशाप्रकारची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता सहायक आयुक्तांमधील या धुसफुसीचा फायदा प्रत्यक्षात विभागातील मेंटनन्स विभागाचे सहायक अभियंता तसेच अतिक्रमण व परवाना विभागाचे अधिकारी यांच्याकडून उठवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुक्तांना आता या प्रकरणात लक्ष घालण्याची वेळ आली आहे. (BMC News)

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.