Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचा 'दादा' हरपला! उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६ जणांचा दुर्दैवी अंत; शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

बारामती : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि दुःखद बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.



अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय घडले?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार यांचे छोटे विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच शेजारील एका शेतात कोसळले. या भीषण अपघातात विमानातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA (नागरी विमान वाहतूक संचालनालय) कडून देण्यात आली आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामती येथील प्रचारसभांसाठी आपल्या खासगी विमानाने रवाना झाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैयक्तिक सहाय्यक (PA) देखील विमानात उपस्थित होते. विमान बारामती विमानतळाच्या जवळ पोहोचले असता, लँडिंगच्या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान थेट एका शेतात कोसळले. सुरुवातीला अजित पवार आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते. प्रशासकीय यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रुग्णालयात हलवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. दुर्दैवाने, DGCA च्या ताज्या अहवालानुसार या अपघातात विमानातील सहाही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण बारामती शहर आणि परिसरात सध्या तणावाचे आणि दुःखाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून या अपघाताच्या कारणांचा सखोल तपास केला जात असून, पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

Kashi Vishwanath Vedic Clock : टिक-टिक नव्हे, आता मुहूर्तात वेळ! काशीत ‘वैदिक घड्याळ’ची एंट्री!

वाराणसी : उत्तर प्रदेशातील जगप्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwnath Temple) आता केवळ अध्यात्माचेच नव्हे, तर भारताच्या

Iran-US-Israel War : युद्ध आणखी पेटणार? इस्रायलने दिला मोठा इशारा; सौदी-बहरैन पूल बंद

मध्य पूर्व आशियामधील युद्ध (Iran-US-Israel War) आता सहाव्या आठवड्यात पोहोचले असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे.

Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबई :

Pratap Sarnaik : शालेय सहलींतून एसटीच्या तिजोरीत १२७ कोटींची भर

महसुलात मोठी वाढ; सुरक्षित प्रवासाला पालकांची पसंती मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या राज्य मार्ग

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात नवीन ट्विस्ट ; IAS पाठोपाठ दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा

नाशिक : नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडू