Iran-US-Israel War : युद्ध आणखी पेटणार? इस्रायलने दिला मोठा इशारा; सौदी-बहरैन पूल बंद

मध्य पूर्व आशियामधील युद्ध (Iran-US-Israel War) आता सहाव्या आठवड्यात पोहोचले असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. ज्यावेळी हे युद्ध काही क्षणांत संपवू असे दावे डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते, त्याच संघर्षात ते आता अडकलेले दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नव्याने इशारा देत स्पष्ट केले आहे की, ठरलेल्या वेळेत होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली केली नाही तर अमेरिका कठोर कारवाई करेल. गरज भासल्यास इराणच्या वीज प्रकल्पांवर आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केले जाऊ शकतात, अशीही चेतावणी त्यांनी दिली. यावर प्रत्युत्तर देताना इराणने ठाम भूमिका घेतली असून, युद्धातील नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत होर्मुज खुली केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.



पाकिस्तानचा मध्यस्थीचा प्रयत्न :


दरम्यान, पाकिस्तानकडून मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत. इराणमध्ये (Iran-US-Israel War) कोसळलेल्या अमेरिकन लढाऊ विमानातील पायलटला मोठ्या बचाव मोहिमेत सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या कारवाईत कोणतीही अमेरिकन जीवितहानी झाली नाही, मात्र पायलट जखमी असल्याची माहिती देण्यात आली. त्याचवेळी A-10 थंडरबोल्ट II हे विमान होर्मुजजवळ कोसळले, पण त्याचा पायलटही वाचवण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवरही हालचाली सुरू असून, ओमान इराणशी संवाद साधत आहे, तर पाकिस्तान आणि इजिप्त अमेरिका-इराण संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.


अशातच आता इस्रायलने (Iran-US-Israel War) मोठा इशारा दिला असून, सौदी अरेबिया आणि बहरीनला जोडणारा किंग फहद कॉजवे हा महत्त्वाचा पूल तात्पुरता बंद करण्यात आला आहे. इराणकडून संभाव्य हवाई हल्ल्यांच्या धमक्यांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. वाढता तणाव लक्षात घेता पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. हा पूल बहरीनसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तो सौदी अरेबियाशी असलेला एकमेव रस्तामार्ग आहे.



रेल्वे आणि संबंधित सुविधांचा वापर टाळण्याचे आवाहन : 


तसेच, इस्रायल डिफेन्स फोर्सेस यांनी इराणमधील (Iran-US-Israel War) नागरिकांना इशारा दिला आहे. त्यांनी लोकांना रेल्वे आणि संबंधित सुविधांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे, कारण त्यांच्यावर हल्ल्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर जारी केलेल्या संदेशात, नागरिकांनी तातडीने रेल्वे प्रवास बंद करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना