Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात नवीन ट्विस्ट ; IAS पाठोपाठ दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा

नाशिक : नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडू लागले आहेत. पोलीस कोठडीत असलेल्या खरातची कसून चौकशी सुरू असतानाच, या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट प्रशासकीय वर्तुळापर्यंत पोहोचले आहेत. अशातच आता या प्रकरणात अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. IAS पाठोपाठ दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी अशोक खरातला मिळालेल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे. यामुळे फक्त नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालीये.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील आयएएस (IAS) अधिकाऱ्यापाठोपाठ दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या. खरातच्या संपर्कात असलेल्या या महिला अधिकाऱ्यांपैकी एक डीसीपी (DCP) तर दुसरी एसीपी (ACP) दर्जाची अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. या दोन महिला पोलीस अधिकारी कोण? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.



हवी तिथे पोस्टिंग मिळावी म्हणून ...


वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या या महिला अधिकाऱ्यांचे नाव खरातसोबत जोडले गेल्याने तपास यंत्रणांनी नव्या मार्गाने तपास सुरू केला आहे. आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी बाबाकडे धाव घेतली होती का? असा सवाल देखील विचारला जात आहे. अशोक खरात प्रकरणात भोंदू बाबासोबत काही आर्थिक व्यवहारही झाले का? याबाबत तपास होण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.



ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल :


अशोक खरातवर (Ashok Kharat) केवळ लैंगिक अत्याचाराचेच नव्हे, तर फसवणुकीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभी केल्याचे आरोपही आहेत. नाशिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांनी जमा केलेली महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या ताब्यात देण्यात आली असून, खरातचे आर्थिक साम्राज्य नेमके कसे उभे राहिले, याचा तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार